For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विसरलेल्या आठवणीही जीवनावर पाडतात प्रभाव

06:23 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
विसरलेल्या आठवणीही जीवनावर पाडतात प्रभाव
Advertisement

ज्या गोष्टी आपण विसरलो आहोत, त्या देखील आमच्या निर्णयांना कुठे ना कुठे प्रभावित करू शकतात का याचा विचार करून पहा. वैज्ञानिकांनी यासंबंधी विस्तृत संशोधन करत निष्कर्ष काढला आहे. हा शोध मेंदूच्या रहस्यांची उकल करणारा आहे. नेचर नियतकालिकात प्रकाशित अध्ययनात संशोधकांनी जुन्या गोष्टी आठवत नसल्या तरीही त्याचा प्रभाव आपल्या दैनंदिन निर्णयांवर पडत असल्याचा दावा केला आहे. येल युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट निक टर्क-ब्राउन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. आम्ही दिवसभर जुन्या आठवणींमध्ये रमून राहत नाही, परंतु आमचा 95 टक्के मेंदू या आठवणींना कुठे ना कुठे साठवून असतो, मग या आठवणी प्रत्येक कामात दिसून येतात, भले मग, कामासाठी ठिकाणी असो किंवा घरी, पालकत्व, शॉपिंग किंवा कुठलेही काम करताना या आठवणी मार्गदर्शन करत असतात.

Advertisement

कसे झाले संशोधन

संशोधकांनी एफएमआरआय स्कॅनच्या मदतीने 60 जणांच्या मेंदूचे अध्ययन केले. या लोकांना काही छायाचित्रे आणि शब्द दाखविण्यात आले, जे नंतर ते विसरून गेले. परंतु जेव्हा या लोकांना काही निर्णय घेण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्यांच्या मेंदूत याच विसरलेल्या आठवणींचा स्पष्ट प्रभाव दिसून आला. यातून या आठवणी सदैव आठवत नसल्या तरीही ते आमच्या वर्तनाला प्रभावित करतात हे दिसून आले.

Advertisement

कसा पाडतात प्रभाव?

स्वत:च्या दैनंदिन जीवनात एखाद्या खास गोष्टीने लक्ष वेधल्यावर तुम्ही त्याला खरेदी करता. अशास्थितीत हा निर्णय एखाद्या जुन्या विसरून गेलेल्या आठवणीने प्रभावित असू शकतो. बालपणी एखादा खाद्यपदार्थ खाल्लेला असेल तर तो पुन्हा पाहिल्यावर खाण्याची इच्छा मनात दाटून येते.

अशाचप्रकारे शिक्षण आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात हा शोध शालेय शिक्षणपद्धतीला बदलू शकतो, असे बोलले जात आहे. मार्केटिंग कंपन्या याचा लाभही घेऊ शकतात, कारण ग्राहकांच्या पसंतीला समजून घेण्यास यामुळे मदत होऊ शकते. भारतात संस्कृती आणि परंपरा बालपणासून शिकविल्या जातात, अशा स्थितीत या आठवणी आमच्या कौटुंबिक निर्णय म्हणजेच विवाह आणि सणांच्या आयोजनालाही प्रभावित करू शकतात.

तज्ञांचे म्हणणे काय?

हे अध्ययन मेंदूच्या न सुटलेल्या कोड्याला समजून घेण्यासाठी मैलाचा दगड आहे. हे संशोधन स्वत:चे वर्तन चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करते. या आठवणींच्या रुपात ज्या गोष्टी आणि स्थिती मेंदूच्या एखाद्या कोपऱ्यात साठवतात, त्या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला निर्माण करण्यास कशाप्रकारे मदत करू शकतात हे समजून घेता येऊ शकते. या संशोधनाला अधिक विस्तृतपणे समजून घेण्यासाठी व्यापक स्तरावर संशोधनाची गरज असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.