For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एचपी इंधन केंद्रावर ईव्ही वाहने होणार चार्ज

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
एचपी इंधन केंद्रावर ईव्ही वाहने होणार चार्ज
Advertisement

ईव्ही चार्जिंग केंद्रांसाठी टाटासोबत व्यवहार : 1 लाख  ग्राहकांना होणार फायदा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (टीपीइएम) ने भारतात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपी) सोबत करार केला आहे. दोन्ही कंपन्या मिळून देशातील प्रमुख ठिकाणी असलेल्या एचपीच्या 21000 हून अधिक इंधन केंद्रांवर (पेट्रोल पंप) ईव्ही चार्जिंग स्टेशन तयार करतील. याचा थेट फायदा टाटा ईव्हीच्या 1.2 लाख ग्राहकांना होणार आहे. दोन्ही कंपन्या चार्जिंग स्टेशनवर सोयीस्कर पेमेंटसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) सोबत काम करत आहेत. भारताच्या ईव्ही मार्केटमध्ये टाटाचा 68 टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, एचपीसीएल ही तेल क्षेत्रातील कंपनी डिसेंबर 2024 पर्यंत 5,000 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापित करण्याच्या लक्ष्यावर काम करत आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे मुख्य धोरण अधिकारी बालाजे राजन म्हणाले, ‘देशात ईव्ही खरेदी वाढत असल्याने चार्जिंग स्टेशनच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणे आवश्यक आहे. त्यात टप्याटप्याने वाढ होत असून सुविधा वाढल्यास इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही नजिकच्या काळात वाढू शकते.

Advertisement

‘ईव्ही’मध्ये टाटाचा 68 टक्केपेक्षा जास्त हिस्सा

आज देशाच्या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या हिस्सेदारीतला वाटा पाहता टाटा ही कंपनी अग्रेसर राहिली आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ही इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये 68 टक्के पेक्षा जास्त हिस्सेदारीसह मार्केट लीडर आहे. कंपनीने 2023 मध्ये ईव्हीच्या एकूण 69,153 युनिट्सची विक्री केली.

एचपीसीएलचे जीएम काय म्हणाले

एचपीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक देबाशीष चक्रवर्ती म्हणाले, ‘एचपीसीएलने 21000 हून अधिक इंधन केंद्रे टाटा मोटर्ससोबत तयार केली आहेत. या दोन्ही कंपन्यांमधील युतीद्वारे, एचपीसीएल उच्च मागणी असलेल्या चार्जिंग स्थानांवर ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करून ईव्ही ग्राहकांना चार्जिंगची सुविधा प्राप्त करुन त्यांची सोय करणार आहे.

Advertisement
Tags :

.