कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अत्यंत वेगाने घटतेय युरोपची लोकसंख्या

07:00 AM Nov 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2100 सालापर्यंत लोकसंख्या संतुलन पूर्णपणे बिघडण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ब्रसेल्स

Advertisement

युरोप आता ‘वृद्ध’ होत असून इटली, पोलंड आणि स्पेन यासारख्या देशांमध्ये लोकसंख्या इतक्या वेगाने कमी होत आहे की, 2100 सालापर्यंत पूर्ण लोकसंख्या सध्याच्या निम्म्या प्रमाणावर येणार आहे. युरोपीय देशांमध्ये आताच गावे रिकामी होत असून घरांची विक्री होत नसल्याचे आणि युवा इतर देशांमध्ये नोकरी शोधत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तेथील जन्मदर अत्यंत खालावला आहे. वृद्धांची संख्या अधिक असून स्थलांतरितांमुळेही मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. पेन्शनच्या भारामुळे युरोपीय देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

स्पेनमध्ये 2024 जन्मदर नीचांकी स्तरावर पोहोचला. देशात केवळ 3 लाख 18 हजार 5 मुलांचा जन्म झाला. 1941 नंतरच्या काळातील हा नीचांकी स्तर आहे. प्रत्येक महिला सरासरी केवळ 1.10 मूल जन्माला घालत आहे. तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी कमीतकमी 2.1 प्रजननदर आवश्यक आहे. जन्मदर वाढविण्यासाठी स्पेनमध्ये कुठलेच ठोस धोरण नाही. सरकारने काही प्रमाणात मदत केली आहे, यात मूल जन्माला घालण्यासाठी सुटी किंवा आर्थिक लाभ जाहीर पेले, परंतु हे पुरेसे नाही. इटलीत जन्म दर 1.2  तर पोलंडमध्ये 1.3 आहे. दक्षिण आणि पूर्व युरोपमध्ये लोक पलायन करत आहेत. युवा जर्मनी किंवा अमेरिका यासारख्या देशांमध्ये नोकरीच्या संधीकरता जात आहेत.

वैज्ञानिक कारण

आर्थिक दबाव : युरोपमध्ये राहणीमान अत्यंत महाग आहे. घर खरेदी, मूलांचे पालनपोषण सर्वकाही खर्चिक आहे. महिला आता शिक्षण आणि नोकरीवर लक्ष केंद्रीत करू इच्छितात, यामुळे विवाह आणि मूलांचा जन्म वेळाने होतोय. जीडीपी (देशाची कमाई) वाढतो, तेव्हा लोक छोटा परिवार पसंत करतात, कारण मुलांचे पालनपोषण महाग होत जाते. स्पेनमध्ये बेरोजगारी अधिक आहे, यामुळे देखील युवा मुलांना जन्म देणे टाळत आहेत.

सामाजिक दबाव : महिला आता पुरुषांप्रमाणे काम करत आहेत. शिक्षण आणि कारकीर्दीला प्राधान्य दिले जातेय. विवाहाचे सरासरी वय 30 वर्षांनंतरचे आहे. युरोपमध्ये घटस्फोटाचे प्रमाणही अधिक आहे. सिंगल पॅरेंट्स वाढत असल्याने मुलांना जन्म देणे आणखी अवघड ठरत आहे.

वृद्ध लोकसंख्या : आताच्या तुलनेत पूर्वी जन्मदर अधिक होता, यामुळे आता वृद्धांची संख्या अधिक तर युवा कमी आहेत, यामुळे वृद्धांना पेन्शन देणे आणि देखभाल करणे अवघड ठरतेय. हा प्रकार लोकसांख्यिक पिरॅमिडला उलटा करतो. खाली कमी युवा, वर अधिक वृद्ध. वैज्ञानिकांनुसार जन्म दर 2.1 पेक्षा कमी राहिल्यास लोकसंख्या आपोआप घटत जाते. युरोपमध्ये हे प्रमाण 1.5 च्या आसपास आहे.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय कारण : लोक पर्यावरणरक्षणासाठी देखील कमी मुले इच्छितात. अधिक लोकसंख्या नैसर्गिक साधनसामग्री संपुष्टात आणेल अशी भीती हवामान बदलामुळे सतावतेय. तसेच मोबाइल आणि सोशल मीडियामुळे जीवन व्यग्र झाले असुन नातेसंबंध कमकुवत झाले आहेत. युरोपमध्ये  शून्य मूल जीवनशैली अंगिकारली जात असल्याचे अध्ययनात दिसून आले.

स्पेनमध्ये संकट का?

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article