महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रेल्वेगाड्यांच्या वेगासंबंधी समिती स्थापन

06:36 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वेगमर्यादेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

रेल्वे बोर्डाने एक समिती स्थापन केली आहे. रेल्वेगाड्यांचे सुरक्षित स्वरुपात संचालन केले जातेय की नाही यावर ही समिती नजर ठेवणार आहे. काही रेल्वेगाड्यांचे संचालन वेगमर्यादेच्या उल्लंघनासोबत होत असल्याच्या तक्रारी रेल्वे बोर्डाला प्राप्त झाल्या आहेत. रेल्वेबोर्डाकडुन स्थापन ही समिती या उल्लंघनाच्या कारणांचा शोध घेणार आहे.

रेल्वे बोर्डाने अलिकडेच काही प्रकरणांची दखल घेतली आहे. दोन रेल्वेगाड्यांच्या चालकांनी एका नदीच्या पूलावर 20 किलोमीटर प्रतितासाच्या वेगमर्यादेचे उल्लंघन केले होते. या पूलाच्या देखभालीचे काम सुरू होते. अशास्थितीत चालकांनी रेल्वेगाड्यांचा वेग 120 किलोमीटर प्रतितास इतका ठेवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

या घटनांनंतर रेल्वेबोर्डाने सर्व रेल्वे विभागांना एक निर्देश जारी केला. रेल्वे बोर्डाने लोको पायलट आणि रेल्वे व्यवस्थापकांना जारी केलेल्या आदेशांच्या समीक्षेसाठी एका समितीची स्थापना केल्याचे यात नमूद आहे.

रेल्वेमार्गाची स्थिती, दुरुस्तीकार्य, जुन्या रेल्वे पूलांच्या देखभालीदरम्यान रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित संचालनासाठी वेगमर्यादा निश्चित केली जाते. लोको पायलट आणि त्याच्या सहाय्यकाला वेगमर्यादेसोबत एक पूर्ण रुट चार्ट दिला जातो. लोक पायलट्सला चार्टनुसारच वेग राखावा लागतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article