For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चर्मकार समाजासाठी स्वतंत्र विकास निगमची स्थापना करा

12:18 PM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
चर्मकार समाजासाठी स्वतंत्र विकास निगमची स्थापना करा
Advertisement

बेळगाव : राज्यातील समगार (चर्मकार) समाजासाठी शिवशरण हरळय्या विकास निगमची स्थापना करून स्वतंत्र निधीची तरतूद करावी, या प्रमुख मागणीसाठी समगार समाजाच्यावतीने बुधवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी राज्यभरातील विविध चर्मकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. समगार गुरुकुलाची स्थापना करण्यासाठी बेंगळूर, बेळगाव, हुबळी, विजापूर येथे जमिनी उपलब्ध करून देत अनुदानाची तरतूद करावी, लेदर वर्क्स कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. परंतु, समगार समाजाच्या सदस्यांना अध्यक्ष अथवा संचालकपद देण्यात आलेले नाही. चर्मकार समाजातील अनेक जण रस्त्याशेजारी चप्पल व बूट दुरुस्तीचे काम करतात. त्यांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करून द्यावीत. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व द्यावे. तसेच कर्नाटक लोकसेवा आयोगामध्ये सदस्यत्व द्यावे, यासह इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

Advertisement

कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील चर्मकार बांधवांचा सहभाग 

यावेळी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील चर्मकार बांधव सहभागी झाले होते. कर्नाटक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी आंदोलनाला भेट देऊन राज्य सरकारकडे मागण्या मान्य करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. आंदोलनावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीश बेटगेरी, सुनील मदलभावी, मंजुनाथ हंजी, परशुराम अरकेरी, जी. आर. कन्नमरी, नागराज कलादगी, दीपक कुडाळकर, जिल्हाध्यक्ष गणेश काळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.