महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मळगाव खानोलकर वाचनालयात उद्या निबंध लेखन स्पर्धा

11:03 AM Dec 01, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

मळगाव येथील प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात २ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दत्ताराम सडेकर पुरस्कृत शालेय गटासाठी निंबध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी आठवी ते दहावी असा गट असून यासाठी मोबाईल ,इंटरनेटचा अतिरेक नको रे बाबा ,भारताची ७५ वर्षातील वैज्ञानिक प्रगती ,कोकणातील जैवविविधता आणि विकासाची संधी हे विषय ठेवण्यात आले आहेत.निंबध लेखनासाठी १ तास वेळ असून शब्द मर्यादा ४०० ते ५०० शब्द आहे. एका प्रशालेतून ४ स्पर्धक सहभागी होऊ शकतात.प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५००,३००,२०० रुपये रोख तसेच दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी रोख १०० रुपये तसेच प्रशस्तीपत्र व ग्रंथ भेट देण्यात येणार आहे.स्पर्धकांनी १ डिसेंबर पर्यंत ग्रंथपाल आनंद देवळी यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी.असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर व कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malgao library#
Next Article