आयएनएस कारवार येथील हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश
अटकेतील तिघांपैकी एकटा गोव्याचा
पणजी : कारवार येथील नौदल शिपयार्डच्या तीन कंत्राटी कामगारांना संशयावरून अटक करण्यात आली आहे. यापैकी एकटा गोव्याचा असून या हेरीगिरी रॅकेटचा पर्दाफाश राष्ट्रीय तापस संस्थेने (एनआयए) केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारवार नौदल शिपयार्डमध्ये हे तीन कामगार कंत्राटी कामावर होते. यापैकी सुनील नाईक, वेतन तांडेल या दोघांना कारवार येथून अटक केली आहे, तर अक्षय नाईक याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. अक्षय नाईक हा कारवार नौदल येथील नोकरी सोडून गोव्यात कामाला आला होता. या तिघांनीही कारवार नौदलाच्या शिपयार्डमधील माहिती व फोटो हैदराबाद येथील दीपक नामक मित्राला पाठविली होती. दीपक याने ही नौदलाची सर्व माहिती व फोटो विदेशी एजंटाकडे पाठविली होती. या बदल्यात दीपकने अटक केलेल्या तिघांही सशयितांना काही रक्कम दिल्याचीही माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतलेल्या तिघाही संशयितांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएचे हे पथक मुंबई येथील असून त्यांनी कारवार नौदलाच्या शिपयार्डमधील पर्दाफाश केला आहे.