‘धमाल 4’मध्ये ईशा गुप्ताची एंट्री
‘हाउसफुल 5’नंतर बॉलिवूडमध्ये अनेक कॉमेडी फ्रेंचाइजीशी निगडित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘धमाल 4’ सामील आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकार काम करत आहेत. आता यात एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.
धमाल 4 मध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताला संधी मिळाली आहे. धमाल 3 चित्रपटात तिने प्राची नावाची भूमिका साकारली होती. आता चौथ्या भागात तिच्या एंट्रीची पुष्टी दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी दिली आहे. ईशा गुप्ता धमाल 4 मध्ये परतल्याने आम्ही आनंदी आहोत. ती एक उत्तम कलाकार आहे. तिच्यासोबत काम करणे आनंदाची बाब असल्याचे इंद्र कुमार यांनी म्हटले आहे.
‘धमाल 4’ चित्रपटात ईशाची भूमिका मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सध्या अधिक माहिती देण्यात आलेली नाही. हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्याच्या आसपास प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, अर्शद वारसी, संजय मिश्रा, जावेद जाफरी आणि संजीदा शेख हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.