एरिगेसी उपांत्य फेरीत, प्रज्ञानंद जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर
वृत्तसंस्था/ लास वेगास
साडेसात लाख अमेरिकी डॉलर्सची बक्षिसे असलेल्या फ्रीस्टाईल ग्रँड स्लॅम टूरमध्ये ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली, परंतु आर. प्रज्ञानंदला अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने तो जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
अर्जुनने अब्दुसत्तोरोववर 1.5-0.5 असा विजय मिळवला, तर प्रज्ञानंदने काऊआनाविऊद्ध 3-4 अशी चुरशीची लढत गमावली. लेव्हॉन अरोनियन आणि हॅन्स मोके निमन या अमेरिकन जोडीने उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे देशबांधव हिकारू नाकामुरा आणि उझबेकिस्तानचा जावोखिर सिंदारोव यांचा पराभव केला. अरोनियनने चार गेम्समध्ये 2.5-1.5 अशा फरकाने विजय मिळवला, तर निमनने सिंदारोव्हला 4-2 ने पराभूत करताना बराच वेळ घेतला. उपांत्य फेरीत अर्जुनचा सामना अरोनियनशी होईल तर निमनची लढत काऊआनाशी होईल.
खालच्या गटात जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्ल्सलेनने पुन्हा एकदा विजयी लय मिळवली आणि विदित गुजरातीला 2-0 असे पराभूत केले. अमेरिकेच्या वेस्ली सोने त्याचा देशबांधव सॅम्युअल सेव्हियनविऊद्ध 1.5-0.5 असा विजय मिळवला, तर लेनियर दुमिंग्वेझ पेरेझने कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेवाविऊद्ध 1.5-0.5 असा सहज विजय मिळवला. जर्मनीच्या विन्सेंट केमरने अमेरिकेच्या रॉबसन रे याचा 2.5-1.5 अशा फरकाने पराभव केला.
अर्जुनने दोन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि सुऊवातीपासूनच फायदा घेतला. दुसऱ्या सामन्यात पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना भारतीय खेळाडूने अब्दुसत्तोरोव्हवर सहज वर्चस्व गाजविण्यास फारसा वेळ लावला नाही आणि फ्रीस्टाईलसारखा हा सामना दिसला नाही. पहिल्या गेममध्येही अर्जुनला सुरुवातीच्या खेळानंतर अनुकूलता प्राप्त झाली होती. परंतु खेळाच्या उत्तरार्धात त्याच्या काही अनपेक्षित चुकांमुळे उझबेकिस्तानच्या खेळाडूला अर्धा गुण मिळाला.
प्रज्ञानंद आणि काऊआना यांनी सात निर्णायक गेम्समध्ये सहभाग घेतला आणि भारतीय खेळाडू तीन वेळा आघाडीवर राहिला. प्रज्ञानंदने पहिला सामना जिंकला, तर दुसरा गमावला आणि सहाव्या गेमपर्यंत ही वाटचाल अशाच पद्धतीने चालू राहिली. काऊआनाने शेवटी निर्णायक सातवा गेम जिंकून बाजी मारली. प्रज्ञानंदसाठी स्पर्धेत हा शेवट नाही. कारण त्याची आता बाद फेरीतील सामन्यांच्या आणखी एका संचात खेळण्यासाठी इतर सात खेळाडूंसह खालच्या गटात रवानगी झाली आहे.