ईआर अँड डी क्षेत्र 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार
नॅसकॉमच्या ईआर अँड डी कौन्सिलचे अध्यक्ष किशोर पाटील
नवी दिल्ली :
भारताचे अभियांत्रिकी संशोधन आणि विकास (ईआर अँड डी) क्षेत्र या दशकाच्या अखेरीस 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते, जे मागील आर्थिक वर्षात 56 अब्ज डॉलर्स होते. हे क्षेत्र भारतातील तंत्रज्ञान उद्योगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये वर्षाच्या आधारावर 7 टक्के वाढ झाली आहे, असे नॅसकॉमच्या ईआर अँड डी कौन्सिलचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले आहे.
यामध्ये ऑटोमोटिव्ह, सेमीकंडक्टर, औद्योगिक, ऊर्जा आणि उपयुक्तता, दूरसंचार, आरोग्यसेवा, जीवन विज्ञान आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे. तुलनेने, सर्वात मोठा उद्योग, आयटी, कमकुवत स्थूल आर्थिक वातावरणामुळे सुमारे 4 टक्क्यांनी वाढत आहे. कमकुवत स्थूल आर्थिक परिस्थितीमुळे ग्राहकांच्या खर्चावर परिणाम झाला आहे.
नॅसकॉमच्या ईआर अँड डी कौन्सिलचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणतात की, पुढील पाच वर्षांत सर्व क्षेत्रांमध्ये वरील एकूण खर्च 10 टक्क्यांपेक्षा जास्त दराने वाढण्याची शक्यता आहे. फरक एवढाच आहे की आकडेवारी पाहून उत्साहित होऊ नका. ही नवीन क्षेत्रे आहेत आणि तंत्रज्ञान आणि व्यवसाय मॉडेल्स व स्पर्धा खूप वेगळी आहे.’ त्यांनी सांगितले की वाढीचा वेग वाढवण्यासाठी काही बदल आवश्यक असतील.
बहुतेक कंपन्या एआय स्वीकारण्यात मागे
त्यांनी सांगितले की, एआय स्वीकारण्याच्या बाबतीत, बहुतेक कंपन्या उत्पादन कार्यक्रमात मागे आहेत. उत्पादन आणि एम्बेडेड अभियांत्रिकीमध्ये आपल्याला त्या तंत्रज्ञानाची अधिक आवश्यकता आहे.
भारतीय ईआर अॅण्ड डी कंपन्यांसाठी युरोप पसंतीचा
भारतीय ईआर अॅण्ड डी कंपन्यांसाठी युरोप हा पसंतीचा बनला आहे कारण या प्रदेशातील वाहन उत्पादकांना चिनी प्रतिस्पर्ध्यांकडून स्पर्धा करावी लागते. चिनी स्पर्धकांनी स्वस्त परंतु अधिक प्रगत तंत्रज्ञानाच्या कारने बाजारपेठेत भर घातली आहे. भारतीय कंपन्या देखील युरोपमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहेत.