इक्विटी म्युच्युअल फंडचा ओघ 29,911 कोटींवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोव्हेंबर 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 29,911 कोटी रुपयांपर्यंत वाढली. ऑक्टोबरमध्ये या फंडांमध्ये 24,690 कोटी रुपयांचा ओघ होता. तथापि, वर्ष-दर-वर्ष आधारावर, इक्विटी फंडांमधील गुंतवणुकीत 17 टक्क्यांनी घट झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये 35,943 कोटी रुपयांची गुंतवणूक नोंदवण्यात आली, अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देण्यात आली आहे.
दुसरीकडे, गेल्या महिन्यात डेट म्युच्युअल फंडांमधून 25,692 कोटी रुपये काढण्यात आले. या काळात, गुंतवणूकदारांनी हायब्रिड योजनांमध्ये 13,299 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये म्युच्युअल फंडांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) 80.80 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली. ऑक्टोबरमध्ये ती 79.87 लाख कोटी रुपये होती.
नोव्हेंबरमध्ये इंडेक्स फंडचा ओघ 1,726.81 कोटी रुपये, गोल्ड ईटीएफचा ओघ 3,741.79 कोटी रुपये नोंदवण्यात आला. म्युच्युअल फंड नोव्हेंबर 2025 मध्ये डेट म्युच्युअल फंडमधून 25,692 कोटी रुपयांचा ओघ नोंदवण्यात आला, अशी माहिती एएमएफआयने दिली आहे.
अग्रवाल यांच्या मते, म्युच्युअल फंड उद्योगाच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 80.5 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे, जी इक्विटी मार्केटवरील सततचा विश्वास दर्शवते. ही वाढ भारताच्या दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेसाठी एक सकारात्मक संकेत आहे.
नोव्हेंबरमधील आकडेवारी : फ्लेक्सी-कॅप्सचे वर्चस्व कायम
नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या श्रेणीमध्ये किती गुंतवणूक
इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणीची गुंतवणूक (कोटींमध्ये)
मल्टीकॅप फंड 2,462.84
लार्ज कॅप फंड 1,639.80
लार्ज एंड मिड कॅप 4,503.31
मिड कॅप फंड 4,486.91
स्मॉल कॅप फंड 4,406.90
डिव्हिडंड यील्ड फंड -277.74
व्हॅल्यू फंड/कॉन्ट्रा फंड 1,219.44
फोकस्ड फंड 2,039.73
सेक्टरल/थीमॅटिक फंड 1,864.99
इएलएसएस-570.17
फ्लेक्सी कॅप फंड 8,135.01
(स्रोत:एएमएफआय)