जिल्हाधिकारी कार्यालयावर ईपीएस 95 धारकांनी काढला मोर्चा
रत्नागिरी प्रतिनिधी
गेली 28 वर्षांपासून ईपीएस 1995 पेन्शनर्सधारकांना पेन्शनसाठी झगडावे लागतेय. मोदी सरकारने देखील पेन्शन बंद केल्याने सेवानिवृत्तांचे अतोनात नुकसान झालेय. विविध संस्थांच्या, कारखान्यांच्या निवृत्त कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्राने आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने जिल्ह्dयातील ईपीएस पेन्शनर्स मोर्चाने धडकले.
ईपीएस पेन्शनर्सच्या पेन्शनवाढीसाठी 11 डिसेंबर रोजी रत्नागिरी जिह्यातील ईपीएस 1995 च्या पेन्शनर्सच्यावतीने हा मोर्चा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यामध्ये विविध संस्थांच्या, कारखान्यांच्या निवृत्त कामगारांचा सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्राने आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 11 डिसेंबर रोजी मारूती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरी जिह्यातील जे के फाईल्स अँड टूल्स, हेंकल केमिकल्स, ]िफनोलेक्स पाईप कंपनी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जनता सहकारी बँक, घरडा केमिकल्स, नोसील कम्पनी, यु एस व्हिटॅमिन्स, नेरोलेक पेंट्स, भारती शिपयार्ड कंपनी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ, यासारख्या अजूनही काही वेगळ्या असलेल्या 186 उद्योगातील सर्वच ईपीएस 1995 च्या ईपीएस 1995 पेन्शनर्स मोठ्या संखेने सहभागी झाले होते.