पर्यावरणविषयक संशोधनाचा अभ्यास आवश्यक
डॉ. सागर ए. वाहनळकर : निपाणी बागेवाडी महाविद्यालयात एकदिवशीय विद्यार्थी राष्ट्रीय परिसंवाद
प्रतिनिधी/ निपाणी
हवामानातील होत असलेला बद्दल आणि यावर्षी पावसाळा एक आठवडा उशिरा सुरू झाल्याचे नमूद करत त्यांनी हवामान पद्धतीतील अस्थिरता कशी होते. हे सांगत विद्यार्थ्यांनी नवीन पिकांच्या जाती, हवामान बदलाला तोंड देण्राया पिकांची निर्मिती आणि पर्यावरण विषयक नवकल्पनात्मक संशोधन, आणि आजची जीवन पद्धती यातील फरक काय आहे याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.सागर वाहनळकर यांनी केले. केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालय, निपाणी ‘इको व्हिजन 2025 बॉटनी आणि प्राणिशास्त्र यांचे सेतू शाश्वत भविष्याकडे’ या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी परिसंवाद बॉटनी आणि झूलॉजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला.
मुख्य अतिथी म्हणून डॉ. सागर ए. वाहनळकर यांनी, कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरण जागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आंतरशाखीय संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे. हवामान बदलाला तोंड देणाऱ्या पिकांची निर्मिती आणि पर्यावरण विषयक नवकल्पनात्मक संशोधन याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांनी झाडाला पाणी घालून प्रतिकात्मक पद्धतीने केले. ज्यातून संस्थेची पर्यावरण संरक्षणातील बांधिलकी अधोरेखित झाली.
कार्यक्रमाध्यक्ष डॉ. एम. एम. हुरळी यांनीही अनियमित पावसाळा आणि जागतिक स्तरावर वाढणाऱ्या हवामान अस्थिरतेबद्दल चिंता व्यक्त केली. भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत वैज्ञानिक आणि पर्यावरण क्षेत्रात विद्यार्थी कोणते योगदान देऊ शकतात, यावर विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. बॉटनी आणि प्राणिशास्त्र या क्षेत्रांतून ताज्या कल्पना, नवीन संशोधन आणि शाश्वत उपायांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित डॉ. सागर वाहनळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे मूल्यांकन केले आणि पर्यावरण विषयातील त्यांचा उत्साह कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
याप्रसंग समन्वयक डॉ. ए. ए. कंबळे, डॉ. एस. एम. रायमाने , डॉ. एम. डी. गुरव, मंजुळा के, डॉ. आनंद केंचक्कनवर, एस. एस. कुंबार, एस. एस. सुन्नाळ आणि यांसह मान्यवर उपस्थित होते. परिसंवादाचा समारोप संवादात्मक सत्राने झाला आणि विद्यार्थ्यांना शाश्वत व पर्यावरणपूरक भविष्य घडविण्यासाठी वैज्ञानिक संशोधन करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. प्रा. एस. बी. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. तेजस्विनी नंदी यांनी अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रेया दडींनवर आणि पूर्वा केनवडे यांनी केले संपदा हेडगे यांनी आभार मानले.