वृक्षारोपणातून पर्यावरणाचे संवर्धन शक्य
आमदार अप्पाजी नाडगौडा यांचे आवाहन
विजापूर : जिह्यातील मुद्देबिहाळ परिसरात वाढत्या जागतिक तापमानाला कमी करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. ग्रीन स्वॅग फ्रेंड्स असोसिएशन, नगरपरिषद, वनविभाग मुद्देबिहाळ येथे बुधवारी वनक्षेत्र वाढण्यास आपणच जबाबदार आहोत, आपणच झाडे लावली पाहिजेत, शेतकऱ्यांनी आपल्याला आवडणारी झाडे लावावीत, ती झाडे वापरण्याऐवजी आपणच वाढवली पाहिजेत. आपण त्याचा वापर करू नये, शेतकरी शेतातील पिकांवर अत्याधिक रासायनिक फवारण्या करत आहेत त्यामुळे मधमाशा मरत आहेत. चिमण्यांची संख्या कमी होत आहे. चिमण्या कमी होण्याचे कारण मोबाईल लहरी नाहीत, रासायनिक फवारणी हेच कारण आहे, असे प्रतिपादन केएसडी महामंडळाचे अध्यक्ष, आमदार अप्पाजी नाडगौडा यांनी केले.
ते पर्यावरण संरक्षण पुरस्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी वनरक्षक पुरस्कार रेश्मा मालनूर, शिवाप्पा राठोड, सुरेश तालीकोटी, मौलासाबा नधापा यांना वनरक्षक पुरस्कार तर जागतिक पर्यावरण दिन चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक कुमार ढवळगी, द्वितीय पारितोषिक प्रेरणा चिनीवार, तृतीय गंगोत्री कुंभार या विद्यार्थ्यांना वनविभागातर्फे रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष बी. एस. मेटी यांनी आमदारांना तालिकोटी रोडवर रोपे लावण्याचे आवाहन केले. महाबळेश गडेद यांनी स्वच्छतेचा अभाव, जलप्रदूषण, वनसंपत्तीचे अतिक्रमण याकडे लक्ष वेधले. डॉ. विरेश पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. स्वागत यशवंत राठोड यांनी केले. बसवराज बिज्जुर, बी. एच. बालाबट्टी, के. आर. कामटे, सुरेश कलाल, अमरेश रेवडी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विलास देशपांडे, पी. आर. कुडगी, जी. एम. हुलागन्नी, डॉ. उत्कर्षा नागुर, डॉ. विजयकुमार गुली, श्रीशैल होळी व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.