उभादांडा येथील युवकांचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश
पक्षात योग्य तो सन्मान केला जाईल-अमित सामंत
वेंगुर्ले (वार्ताहर)-
उभादांडा येथील २५ युवक कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करून पक्षाचे अधिकृत सभासदस्यत्व स्विकारले. या प्रवेशासाठी प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. नम्रता कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांचे विशेष प्रयत्न आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा स्विकार करून जिल्हयातील पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पक्ष संघटना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून वेंगुर्ले तालुक्यातील पक्षाची संघटना अधिक मजबुत करणार आहे असे प्रतिपादन शरदचंद्र राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले.येथील ओंकार मंगल कार्यालयात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आयोजित युवकांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रदेश महिला उपाध्यक्षा सौ. नम्रता कुबल, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी नितीन कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी सरपंच राजू गवंडे, तालुका उपाध्यक्ष बबन पडवळ, शहर उपाध्यक्ष अमित म्हापणकर, शहर सचिव स्वप्नील रावळ, युवती शहर अध्यक्षा अपूर्वा परब, श्रध्दा साटेलकर, सुहास मांजरेकर, रामेश्वरी गवंडे, लाडोजी सारंग, सुहास मोचेमाडकर आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.