राज्याची मोठी जबाबदारी ,मात्र जनतेला न्याय देण्यासाठी तत्पर
मंत्री दीपक केसरकरांचा मळगाव, तळवडे, मळेवाड येथे जनसंवाद
न्हावेली / वार्ताहर
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे राज्याचे शिक्षण तथा मराठी भाषा हे मंत्रीपद आल्यानंतर सरकारमधील राज्यभरातील महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे मतदारसंघातील जनतेसाठी त्यांना वेळ देता आला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी असलेला त्यांचा संपर्क काहीसा दुरावला.दिपक केसरकर म्हणजे सर्वसामान्य जनतेला वाटेल तिथे भेटणारे गोरगरीब ,श्रीमंत कुणीही असो स्वतः त्यांना हाक मारणारे अशी त्यांची ओळख आहे.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्याने त्यांनी प्रचार सुरु केला असून मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्याचा ते प्रयत्न करत आहेत.दिपक केसरकर म्हणजे धार्मिक वृत्तीचे नेते शिर्डीचे श्री साईबाबा आणि श्री दत्तगुरुंवर त्यांची अपार श्रद्धा माजगाव येथील दत्तमंदिर मध्ये श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेऊन गुरुवारी सकाळी त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला.यावेळी मळगाव बाजारपेठेतील व्यापारी वर्ग,रिक्षावाले शालेय विद्यार्थी आदी सर्वसामान्य जनतेशी त्यांनी हसतमुखाने संवाद साधला कित्येकांनी आपल्या प्रेमाने प्रतीक म्हणून गुलाब पुष्प देत त्यांचे स्वागत केले.मळगाव बाजारपेठेतील सिंधुदुर्ग बॅंक परिसरातील छोटेखानी सभेत सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी प्रेमाने दिपक केसरकर यांना गुलाब पुष्प देत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि सर्वांनी दिपावलीच्या शुभेच्छा देखील दिल्या.यावेळी बोलताना दिपक केसरकर यांनी राज्यात मोठ्या जबाबदाऱ्या असल्याने आपल्याला जनतेशी संवाद साधता आला नाही.त्यांना भेटता आले नाही. त्यामुळे यापुढे आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे.की,आपल्यावर राज्याची नको तर कोकणची जबाबदारी द्या म्हणजे आपण लोकांमध्ये राहून मंजूर झालेले विकास प्रकल्प पूर्ण करणार आहे.दिपक केसरकर म्हणजे विकासाचे व्हिजन असलेले नेते परंतु गेली काही वर्षे राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांना मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत मिसळता आले नाही.जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात कोणतीही कसर सोडली नाही.परंतु त्यांचा मूळ स्वभावच असा आहे की,ते मंत्री असो की नसो मतदारसंघातील प्रत्येकाशी हसतमुखाने प्रेमाने बोलतात त्यामुळे त्याच्यांशी संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ते आपलेसे वाटतात.केसरकरांच्या या स्वभावामुळे ते सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघातील जनतेचे प्रतिनिधी लोकनेते म्हणून तीनवेळा विधानसभेत गेले आमदार मंत्री झाले.आणि आजही लोकांच्या प्रेमामुळे जनतेच्या विश्वासावर ते पुन्हा चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरले असून जनतेचे आशीर्वाद घेत असतानाच जनतेचे भरपूर प्रेम देखील मिळत आहे.त्यामुळे केसरकर आपल्या विरोधात कोण आहे याचा ते कधीच विचार करत नाहीत तर भेटेल त्याला आपलंसं करत यशस्वी वाटचाल करतात.याचीच प्रचिती आज मळगाव,तळवडे,मळेवाड येथील प्रचार दौऱ्यात आली.