महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवणात उबाठा पक्षाला पुन्हा धक्का

11:25 AM Nov 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उबाठा उपतालुकाप्रमुख अंजना सामंत यांचा शिवसेनेत प्रवेश

Advertisement

खासदार नारायण राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाला पुन्हा एकदा महायुतीने धक्का दिला आहे. मालवण उबाठा गटाच्या महिला उपतालुकाप्रमुख अंजना सामंत यासह दत्तप्रसाद सामंत, ऋषिकेश सामंत यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. महायुती तथा भाजपचे जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, आशिष हडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, उपतालुका प्रमुख पराग खोत, आशिष हडकर, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर,उपतालुकाप्रमुख प्रियंका मेस्त्री यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेशकर्त्या अंजना सामंत म्हणाल्या जनतेवर अन्यायकारक मालवण शहर विकास आराखडा रद्द व्हावा याबाबत नागरिकाची भूमिका असतानाही आमदारांनी आवाज उठवीला नाही. त्यासोबतच ग्रीन झोन, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवले नाहीत. मालवण बस स्थानकाचा प्रश्न सहा वर्षे सोडवता आला नाही. नवी इमारत रखडल्याने जुन्या नादुरुस्त अश्या धोकादायक इमारत खाली प्रवासी थांबत आहेत. त्यामुळे विकासाचा दृष्टिकोन ठेऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या योजना येत आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय होत आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघात विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व निलेश राणे कार्यरत असून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्नाशील राहणार असल्याचे अंजना सामंत यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news update # konkan update # tarun bharat sindhudurg
Next Article