For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजन तेली हे फिरता चषक: सिद्धेश परब

05:27 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राजन तेली हे फिरता चषक  सिद्धेश परब
Advertisement

केसरकरांच्या उपस्थितीत शिरोडा उपसरपंच, आरवली सरपंचांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Advertisement

सावंतवाडी: प्रतिनिधी

काँग्रेसमधून बाहेर पडलेले वेंगुर्लेचे माजी उपसभापती सिद्धेश परब यांनी आपल्या शिरोडा गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. महाविकास आघाडीने फिरता चषक असलेल्या राजन तेलींना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत असे त्यांनी सांगितले.श्री. केसरकर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती बाळा गावडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, युवासेना विभागप्रमुख नील प्रभुझांट्ये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामपंचायत सदस्य अनिक्षा गोडकर, पांडुरंग नाईक यांनी प्रवेश केला. शिरोड्यातील रस्त्यांची कामे झालेली आहेत. सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. त्या ठिकाणी जमिनीवर कोणतेही बांधकाम होणार नाही असे पत्रक दिलेले आहे. शिरोडावासीयांचे सर्व प्रश्न मी मार्गी लावणार आहे असे आश्वासन श्री. केसरकर यांनी दिले.काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना सामील करून घेतले. ठाकरेंचे विचार आम्हाला पटले नाही. फिरता चषक असलेल्या राजन तेलींना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. राजन तेलींनी मतदारसंघात गैरसमज पसरवण्याचे काम केलं आहे. शिरोडा येथे सुसज्ज असे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ केसरकर यांच्या पाठीशी राहणार आहे असे आश्वासन सिद्धेश परब यांनी दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.