पूर्ण देशच भाडेतत्वावर मिळविता येणार
तत्पूर्वी जाणून घ्या भाडे
तुम्ही पैसे असल्यास काहीही खरेदी करू शकता असे बोलले जाते. तर जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रेंटवर रुम घेऊन राहता, तेव्हा त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. परंतु कधी एखाद्या व्यक्तीने पूर्ण देशच भाडेतत्वावर मिळविल्याचे ऐकले आहे का? एक देश असा आहे जो भाडेतत्वावर मिळविता येतो.
भाडेतत्वावर उपलब्ध या देशाचे नाव लिकटेंस्टाइन आहे. हा युरोपच्या मध्यभागी स्थित भूवेष्टित देश आहे. स्वीत्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्यादरम्यान हा देश आहे .याचे क्षेत्रफळ केवळ 160 चौरस किलोमीटर इतके आहे. तर या देशाची लोकसंख्या सुमारे 39 हजार इतकी आहे. लिकटेंस्टीन हा देश स्वत:चे सुंदर पर्वत, नद्या आणि सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो. येथील लोक स्वत:च्या परंपरांना अत्यंत मानणारे आहे. तर हे ठिकाण शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक आहे.
लिकटेंस्टीन हा देश तुम्ही 70 हजार डॉलर्समध्ये एक दिवसासाठी भाडेतत्वावर मिळवू शकतात. येथील सरकारने 2010 मध्ये या देशाला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर येथील एखादे गावही संबंधितांना भाडेतत्वावर मिळविता येणार आहे.
लिकटेंस्टीन या सुंदर देशाला भेट देण्याची सर्वोत्तम काळ उन्हाळ्यातील असतो. तेव्हा येथील हवामान अत्यंत सुखद असते. जर तुम्ही स्कीइंगचे चाहते असालतर हिवाळ्यात येथे जाणे उत्तम. लिकटेंस्टीनची परिवहन व्यवस्था चांगली असून येथील बसेस अन् ट्राम वेळेवर धावत असतात. तसेच तेथे सायकल भाडेतत्वावर मिळविण्याची व्यवस्था देखील उपलब्ध आहे. यामुळे सहजपणे तेथे फेरफटका मारता येतो. लिकटेंस्टीन हा देश युरोपीय महासंघाचा सदस्य नाही. परंतु शेंगेन क्षेत्राचा सदस्य आहे. शेंगेन व्हिसाधारकांना तेथे जाण्यास कुठलीच समस्या उद्भवत नाही.