महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पिरनवाडी-राकसकोप येथे दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

10:18 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

तालुक्याच्या पश्चिम भागातील पिरनवाडी व राकसकोप येथील दुर्गामाता दौडला धारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राकसकोप गावात शनिवारी दुर्गामाता दौडनिमित्त ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा सजीव देखावा साकारण्यात आला होता. यामध्ये ग्रामीण महिलांची कांडणे, दळणे, आदी सजीव देखावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज व थोर महात्म्यांच्या वेषभूशा बालकांनी साकारल्या होत्या. राकसकोप येथील दुर्गामाता उत्सव मंडळ, आंबेडकर गल्ली येथून शस्त्रपूजन व ध्वजपूजन करून दौडला सुरुवात झाली. संपूर्ण गावभर ही दौड निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दौडची सांगता झाली. दौडमध्ये बेळगुंदी विभागातील बोकनूर, बिजगर्णी, कावळेवाडी, यळेबैल, सोनोलीतील धारकऱ्यांचा समावेश होता. पिरनवाडी येथील सिद्धेश्वर मंदिरातून शनिवारी पहाटे दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. दौड मारुती गल्ली, भगतसिंग गल्ली, विष्णू गल्ली आदी परिसरात काढण्यात आली. आरती ओवाळून महिला दौडीचे स्वागत करीत होत्या. ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र कार्यकर्त्यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. दौडची सांगता जनता प्लॉट मारुती मंदिर येथे झाली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article