For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हास्तरीय सेटल बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

06:01 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हास्तरीय सेटल बॅडमिंटन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद
Advertisement

विविध गटातील मुले, मुली अंतिम फेरीत

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव

बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरीय सेटल बॅडमिंटन स्पर्धेत उद्घाटन दिवशी 11, 13, 15, 17 व 19 गटातील मुला, मुलींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

Advertisement

महाबळेश्वर येथील बेळगाव जिल्हा बॅडमिंटन क्लब आयोजित बेळगाव क्लबच्या सभागृहात आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत 11 वर्षांवरील मुलांच्या गटात तनिष्क वि. वि. आर्यन 30-7, शौनक वि. वि. मयांक 30-12, सार्थक वि. वि. आराध्य 30-26, हार्दिन वि. वि. दिव्यानेश 30-21 तर उपांत्य फेरीत शौनक वि. वि. तनिष्क 21-14, 21-10 तर दुसऱ्या उपांत्य फेरीत हार्दिन वि. वि. सार्थक 21-17, 21-13. मुलींचा गट अराध्या वि. वि. ऋतु 30-12, अर्णवी वि. वि. प्रणिती 30-8, तन्वी वि. वि. सानसा 30-24, निरल वि. वि. स्वरा 30-14, तर उपांत्य फेरीत अराध्या वि. वि. अर्णवी 21-15, 21-6 तर उपांत्य फेरीत तन्वी वि.वि. निरल 21-13, 11-21, 20-17 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम  फेरीत प्रवेश केला.

13 वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रितम वि. वि. वरुण 30-0, विराज वि.वि. अध्यंत 30-17, वैभव वि. वि. विवान 30-20, समन्यु वि.वि. अॅगस्टी 30-5, तर उपांत्य फेरीत समन्यु वि. वि. वैभव 21-15, 21-16 अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात अर्णा वि. वि. मायरा 30-10, जानवी वि. वि. क्रिस्टल 30-9 पराभव करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला.

15 वर्षांखालील गटात मुलांमध्ये नमन वि. वि. वेदांत 30-26, अभिलाश वि. वि. साईश 30-16, प्रितम वि. वि. यश 30-15, रणवीर वि.वि. गगन 30-18 तर मुलींच्या गटात आदित्यी वि.वि. वैष्णवी 30-15, आस्था वि. वि. स्वामीनी 30-15, अल्ड्राना वि.वि. सानवी 30-29, अर्णा वि.वि. अनिका 30-20 असा प्रराभव करत उपांत्य फेरी गाठली.

17 वर्षांखालील मुलांमध्ये वृशंक वि.वि. श्रेयेश 30-12, आदित्य वि.वि. इतान 30-8, प्रितम वि. वि. नमन 30-18, साईश वि.वि. रित्नेश 30-15 तर मुलींच्या गटात तनिष्का कोरीशेट्टी वि. वि. सृष्टी 30-11, सानवी वि. वि. जुई 30-27, शिवानी वि. वि. निशा 30-26, आदित्य वि. वि. अल्ड्राना 30-16 तर उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्का कोरीशेट्टीने सान्वीचा वि. वि. 21-7, 21-8, आदित्यी ए. श्रावणीचा 21-15, 22-20 असा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला.

19 वर्षांवरील मुलांच्या गटात ओम के.ने मल्हारचा 21-5, 21-8 तर प्रितमने ओमचा 21-16, 21-19 तर मुलींमध्ये सीयाने सृष्टीचा 21-12, 21-15 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

अंतिम सामने रविवारी सकाळी 9 वाजता खेळविण्यात येणार असून दुपारी बक्षीस वितरण होणार आहे.

Advertisement
Tags :

.