काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातही उत्साहपूर्ण मतदान
60 टक्क्यांहून अधिक जणांनी बजावला हक्क : 239 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यासाठीही उत्स्फूर्त मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्रावर लोकांची गर्दी दिसून आल्यानंतर दिवसअखेर विक्रमी मतदानाची नोंद झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59 टक्के मतदानाची नोंद झाल्यामुळे एकंदर मतदानाचा टक्का 60 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अधिकृत आकडेवारी गुऊवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमधील 26 जागांसाठी मतदान झाले. या टप्प्यात 239 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदानाबाबत लोकांमध्ये उत्साह होता. यादरम्यान वैष्णोदेवी येथे सर्वाधिक 75 टक्के मतदान झाल्याचे समजते. मात्र, श्रीनगरमध्ये 23 टक्के मतदान नोंदविले गेले. ओमर अब्दुल्ला आणि रविंद्र रैनाही मतदान करताना दिसले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुऊवात झाली. सायंकाळी 6 वाजता मतदान संपले. दुपारी 3 वाजेपर्यंत 46.1 टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीर विधानसभेत 90 जागा आहेत. येथे तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान आधीच झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानही पूर्ण झाले आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. सर्व टप्प्यातील मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांपैकी 15 जागा मध्य काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टप्प्यात 239 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 233 पुऊष आणि 6 महिला आहेत. दुसऱ्या टप्प्यात 131 उमेदवार लक्षाधीश असून 49 जणांवर गुन्हे दाखल आहेत.