For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावच्या विकासासाठी उत्साही खासदाराची गरज

12:59 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावच्या विकासासाठी उत्साही खासदाराची गरज
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : महांतेशनगर येथे प्रचारफेरी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरासाठी तितक्याच वेगाने काम करणाऱ्या खासदाराची गरज आहे. यासाठी काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना अत्याधिक मते देऊन निवडून द्यावे, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. महांतेशनगर येथील महांत भवन येथे आयोजित प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. बेळगाव शहराची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. तरुणांना रोजगार देण्याबरोबरच उत्साहाने काम करणाऱ्या खासदारांची गरज आहे. यासाठी काँग्रेस उमेदवार युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांना मतदान करावे, असे आवाहन केले. राज्यातील 1.20 कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेचा लाभ दिला जात आहे. मृणाल हेब्बाळकर म्हणाले, बेळगावच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून योजना आणून त्या राबविणे गरजेचे आहे. शहराच्या विकासासाठी मेट्रो, फ्लायओव्हर, उद्योग-व्यवसाय उभारण्याबरोबर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ, शशिकांत नाईक, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, अॅड. एन. बी. निर्वाणी, ज्योती भावीकट्टी, गिरीश बाळेकुंद्री, दिनेश बाळेकुंद्री, आर. पी. पाटील उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.