गुंजीत अबालवृद्धांनी लुटला इंद्रधनुष्य पाहण्याचा आनंद!
10:45 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुंजी : शनिवारी सूर्यास्तावेळी अचानक आभाळ दाटून आले. रिमझिम पावसानंतर क्षणार्धात गावच्या पूर्व दिशेला इंद्रधनुष्याने मोठी पूर्ण कमान केली. बघता बघता इंद्रधनुष्याचे भडक रंग दिसू लागले. त्यामुळे हे नैसर्गिक विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या घराची गच्ची गाठून मनमुराद आनंद लुटला. लहान मुलांनी तर इंद्रधनुष्य पाहण्यासाठी एकमेकाला सांगण्यात धन्यता मानून गलबला केला. प्रत्येकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून टिपले आणि एकमेकांना शेअर केले. तर काही जणांनी स्टेटस देखील ठेवून आपला आनंद व्यक्त केला. त्यामुळे सोशल मीडियावर या इंद्रधनुष्याची जोरदार चर्चा पहावयास मिळाली. नेहमी अनेकवेळा इंद्रधनुष्याचे दर्शन घडते मात्र शनिवारचा इंद्रधनुष्याचा अविष्कार वेगळाच होता अशी चर्चा सुरू होती.
Advertisement
Advertisement