महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंडचा युवा महिला संघ उपांत्य फेरीत

06:34 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर टिली कॉर्टिन कोलमन : 8 धावांत 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ कुचिंग (मलेशिया)

Advertisement

आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत भारतीय युवा महिला संघाने यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे.

सोमवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 6 गड्यांनी पराभव केला. इंग्लंड संघातील गोलंदाज टिली कॉर्टिन कोलमन आणि प्रिशा ठाणावाला यांनी न्यूझीलंडचे 7 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या डावाला तत्पूर्वी बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. त्यांची एकवेळ स्थिती बिनबाद 49 अशी होती. पण त्यानंतर त्यांचे सर्व गडी 40 धावांत बाद झाले. न्यूझीलंडकडून इंग्लंडला विजयासाठी 90 धावांचे आव्हान मिळाले. आणि इंग्लंडने 11.4 षटकात 4 बाद 90 धावा जमवित हा सामना जिंकला. न्यूझीलंडच्या डावामध्ये केटी इरविनने 35 तर मॅक्लोडने 18 धावा केल्या. इंग्लंडतर्फे कोलमनने 8 धावांत 4 तर प्रिशाने 19 धावांत 3 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये जेमीमा स्पेन्सने 29, डेव्हिना पेरिन 21 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे ऋषिका जैस्वालने 22 धावांत 2 तर फ्रान्सिसने 6 धावांत 1 गडी बाद केला. या विजयामुळे या स्पर्धेत सुपर सिक्स फेरीत गट दोनमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे पहिल्या 2 स्थानावर राहिले आहेत.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड 20 षटकात सर्वबाद 89 (इरविन 35, मॅक्लोड 18, कोलमन 4-8, प्रिशा 3-19), इंग्लंड 11.4 षटकात 4 बाद 90 (स्पेन्स 29, पेरिन 21, ऋषिका जैस्वाल 2-22, फ्रान्सिस 1-6).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article