For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडचा पहिला डाव 325 धावात समाप्त

06:21 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडचा पहिला डाव 325 धावात समाप्त
Advertisement

कर्णधार पॉपचे दीडशतक : डकेटचे अर्धशतक, रत्ननायके प्रभावी

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

यजमान इंग्लंड आणि लंका यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी उपाहारावेळी इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. कर्णधार ओली पॉपने शानदार दीडशतक (154) तर डकेटने अर्धशतक (86) झळकाविले. लंकेतर्फे रत्ननायकेने 56 धावांत 3 तर विश्वा फर्नांडो, कुमारा आणि धनंजय डिस्लिव्हा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

या मालिकेत इंग्लंडने पहिले सलग दोन सामने जिंकून लंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. लंकेचा संघ आता या सामन्यात व्हाईटवॉश टाळण्यासाठी झगडत आहे. इंग्लंडने 3 बाद 221 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे सात गडी 104 धावांची भर घालत तंबूत परतले. 103 धावांवर नाबाद राहिलेल्या कर्णधार पॉपने आपले दीडशतक पूर्ण केले. त्याने 156 चेंडूत 2 षटकार आणि 19 चौकारांसह 154 धावा झळकाविल्या. सलामीच्या डकेटने 79 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 86 धावा जमविल्या. स्मिथने 16, ब्रुकने 19 तर स्टोनने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15 धावा केल्या. लंकेतर्फे रत्ननायकेने 56 धावांत 3 तर विश्वा फर्नांडो, कुमारा आणि धनंजय डिस्लिव्हा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. उपाहारावेळी लंकेने बिनबाद 1 धाव जमवली होती.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 69.1 षटकात सर्वबाद 325 (पॉप 154, डकेट 86, ब्रुक 19, स्मिथ 16, स्टोन नाबाद 15, रुट 13, रत्ननायके 3-56, विश्वा फर्नांडो, धनंजय डिस्लिव्हा, कुमारा प्रत्येकी 2 बळी, असिता फर्नांडो 1-88).

लंका 5 बाद 142

लंकन संघाने शनिवारी चहापानापर्यंत पहिल्या डावात 5 बाद 142 धावा जमविल्या. सलामीच्या निशांकाने 51 चेंडूत 9 चौकारांसह 64 धावा जमविल्या. करुणारत्नेने 1 चौकारासह 9, कुशल मेंडीसने 3 चौकारांसह 14, मॅथ्यूजने 3 धावा केल्या. चंडीमलला खातेही उघडता आलेनाही. चहापानावेळी धनंजय डिस्लिव्हा 2 चौकारांसह 16 तर कमिंदू मेंडीस 5 चौकारांसह 34 धावांवर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे स्टोनने 2 तर वोक्स व हूल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेचा संघ अद्याप 183 धावांनी पिछाडीवर आहे.

Advertisement
Tags :

.