For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानपुढे आज इंग्लिश महिलांचे कठीण आव्हान

06:50 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानपुढे आज इंग्लिश महिलांचे कठीण आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

सलग तीन विजयांनंतर इंग्लंड वेगळ्याच पातळीवर पोहोचले असल्याचे दिसून येत आहे आणि आज बुधवारी येथे होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक सामन्यात जेव्हा इंग्लंड व पाकिस्तान हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील तेव्हा पाकिस्तानकडून त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले जाण्याची शक्यता कमीच आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या 10 गड्यांनी पराभवाने सुऊवात झालेल्या मोहिमेतील तीन एकतर्फी विजयांमुळे इंग्लंडला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे आणि नॅट सायव्हर-ब्रंटचा संघ साखळी फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन मोठ्या संघांविऊद्ध लढण्यापूर्वी आपल्या मोहिमेला आणखी वेग देण्याची आशा बाळगेल. सायव्हर-ब्रंटने आतापर्यंत कर्णधारपदास साजेश कामगिरी केली आहे आणि आपण फलंदाजी व गोलंदाजीने विरोधी संघावर किती विनाशकारी परिणाम घडवू शकते हे दाखवून दिले आहे. या 33 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने चेंडूमागे एक धाव या गतीने 117 धावा काढल्या आणि तिच्या अस्वस्थ करणाऱ्या वेगाच्या जोरावर दोन बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडने सहयजमान श्रीलंकेचा 89 धावांनी पराभव केला.

Advertisement

सायव्हर-ब्रंटव्यतिरिक्त एमी जोन्स, टॅमी ब्युमोंट, हीथर नाईट आणि सोफिया डंकलीसारख्या फलंदाजांचा समावेश असलेला हा संघ सहा गुणांनिशी सात वेळचा विजेता ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर असून यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पाकिस्तानला कोलंबोमध्ये त्यांचे सर्व सामने खेळण्याची संधी मिळालेली आहे. पण योग्य नियोजन, रणनीती किंवा तंत्राविना तो हौशी संघासारखा दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा फडशा पाडून गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी इंग्लंडला मिळेल.

इंग्लंडने वेगवेगळ्या ठिकाणांशी आणि खेळपट्ट्यांशी किती लवकर त्यांना जुळवून घेता येते हे दाखवून दिले आहे. त्यांनी त्यांचे सुऊवातीचे दोन सामने गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविऊद्ध खेळले आणि नंतर श्रीलंकेविऊद्ध खेळण्यासाठी कोलंबोला उ•ाण केले. जर श्रीलंकेला वाटले होते की, ते त्यांच्या फिरकी गोलंदाजांच्या फौजेने इंग्लंडला हरवू शकतील, तर ते चुकीचे होते. कारण सायव्हर-ब्रंटच्या संघाने डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टोनच्या मदतीने त्यांचा डाव त्यांच्याच अंगावर उलटविला. श्रीलंका संघ ज्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू इच्छित होता त्या खेळपट्टीवर तिने चार बळी घेतले. धावसंख्या उभारणे कठीण होईल हे लक्षात घेऊन इंग्लंडने नंतर आपली रणनीती बदलली आणि फिरकीपटूंना स्थिरावू दिले नाही. मात्र या प्रक्रियेत काही फलंदाज त्यांना गमवावे लागले.

सायव्हर-ब्रंट आणि तिच्या प्रमुख फलंदाजांचे पाकिस्तानविऊद्धही तशीच अचूक आणि जमिनीवरून फटके हाणण्याची रणनीती वापरण्याचे लक्ष्य असेल. कारण पाकिस्तानही इंग्लंडला रोखण्यासाठी त्यांच्या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून असेल. इंग्लंडला बांगलादेश आणि श्रीलंकेविऊद्ध मधल्या आणि शेवटच्या फळीतील फलंदाज मोठ्या प्रमाणात गमवावे लागले. ही समस्या त्यांना सोडवावी लागेल. चार वेळा विश्वचषक विजेत्या संघाला लढाऊ भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविऊद्ध  तसे घडणे परवडणार नाही.

तीन सामन्यांत पराभव पत्करून तळाशी असलेल्या पाकिस्तानसाठी परिस्थिती बिकट असून त्यांच्या फलंदाजांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. तर गोलंदाजांनी, विशेषत: माऊफा अक्तर आणि शोर्ना अक्तर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत फक्त एकदाच 150 धावा ओलांडल्या आहेत. फातिमा सानाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेकडून पुनरागमनातून धडा घेऊ शकतो. दक्षिण आफ्रिका इंग्लंडविऊद्ध 69 धावांवर डाव संपुष्टात आल्यानंतर आणि 10 गड्यांनी पराभूत झाल्यानंतर उसळी घेऊन स्पर्धेत परतले.

Advertisement
Tags :

.