For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

06:07 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी
Advertisement

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

Advertisement

वृत्तसंस्था / ब्रिस्टॉल

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान इंग्लंडने विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील झालेल्या तिसऱ्या समान्यात इंग्लंडने विंडीजचा 9 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात 25 धावांत 2 गडी बाद करणाऱ्या लूक वूडला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. केवळ 11 दिवसांच्या कालावधीत इंग्लंड क्रिकेट संघाने दोन मालिका जिंकल्या आहेत.

Advertisement

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 6 बाद 196 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 18.3 षटकात 6 बाद 199 धावा जमवित हा सामना जिंकला.

विंडीजच्या डावामध्ये चार्ल्सने 39 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह 47, कर्णधार हॉपने 38 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारासह 49 धावा झळकविल्या. सलामीचा लेवीस पहिल्याच चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी बाद झाल्यानंतर चार्ल्स आणि हॉप यांनी दुसऱ्या गड्यासाठी 65 चेंडूत 90 धावांची भागिदारी केली. रुदरफोर्डने 6, पॉवेलने 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 34, शेफर्डने 11 चेंडूत 2 षटकारासह 19, होल्डरने 9 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 29 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 15 षटकार 11 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे वूडने 25 धावांत 2 तर केर्स, बेथेल, रशिद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 55 धावा जमविताना 1 गडी गमविला. 10 षटकाअखेर विंडीजने 1 बाद 82 धावा जमविल्या होत्या. विंडीजने शेवटच्या दोन षटकात 47 धावां झोडपल्या. आदिल रशीदच्या एका षटकात विंडीजच्या फलंदाजांनी 31 धावा जमविताना 5 षटकार ठोकले. रशिदच्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर होल्डरने 3 षटकार खेचले तर शेवटच्या दोन चेंडूवर शेफर्डने षटकार मारले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. सलामीचा स्मिथ केवळ 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर डकेट आणि बटलर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागिदारी केली. डकेटने 18 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30, बटलरने 36 चेंडूत 2 षटकार 4 चौकारांसह 47 धावा जमविल्या. कर्णधार ब्रुकने 20 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34, बेथेलने 10 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 26, बॅन्टनने 11 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 30 धावा झोडपल्या. इंग्लंडच्या डावामध्ये 10 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 58 धावा जमविताना 1 गडी गमविला. इंग्लंडच्या डावामध्ये मधळ्या फळीतील पाच फलंदाजांनी धावांचे योगदान दिल्याने हा सामना इंग्लंडला सहज जिंकता आला. विंडीजतर्फे अल्झारी जोसेफने 45 धावांत 2 तर अकिल हुसेन, होल्डर, सेफर्ड आणि चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी साऊदम्पटन येथे खेळविला जाईल.

संक्षिप्त धावफलक: विंडीज 20 षटकात 6 बाद 196 (चार्ल्स 47, हॉप 49, पॉवेल 34, शेफर्ड 19, होल्डर नाबाद 29, वूड 2-25, केर्स, बेथेल, रशिद, जॅक्स प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 18.3 षटकात 6 बाद 199 (डकेट 30, बटलर 47, ब्रुक 34, बेथेल 26, बॅन्टन नाबाद 30, अवांतर 15, जोसेफ 2-45, हुसेन, होल्डर, शेफर्ड, चेस प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.