महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोलशून्य बरोबरीमुळे इंग्लंडसह स्लोव्हेनियाही बाद फेरीसाठी पात्र

06:48 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलोन (जर्मनी)

Advertisement

गटात अव्वल, अपराजित आणि युरो 2024 च्या बाद फेरीत अनुकूल रचना अशी इंग्लंडची स्पर्धेच्या या टप्प्यावर परिस्थिती आहे. कोलोन स्टेडियमवर स्लोव्हेनियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांना 0-0 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. जर्मनीतील इंग्लंडच्या या कामगिरीवर टीका होत आहे.

Advertisement

व्यवस्थापक गॅरेथ साउथगेट यांनी यासंदर्भात बोलताना, ‘मी कोणत्याही संघाला पात्र ठरून अशी वागणूक मिळताना पाहिलेले नाही’, असे म्हटले आहे. त्यांनी ताबा घेतल्यानंतर 2018 मधील विश्वचषक स्पर्धेपासून प्रत्येक मोठ्या स्पर्धेच्या गट टप्प्यातून संघाने पुढे जाण्यात यश मिळविण्याचा वैयक्तिक पराक्रम त्यांनी अबाधित ठेवला आहे.

या युरोमध्ये इंग्लंडची वाटचाल फारशी पाहण्याजोगी राहिलेली नाही. सर्बियाविरुद्ध त्यांनी 1-0 असा विजय मिळविला. ‘क’ गटातील हा त्यांचा एकमेव विजय राहिला. डेन्मार्कसोबत त्यांनी 1-1 अशी बरोबरी, तर स्लोव्हेनियासोबत गोलशून्य बरोबरी साधली. थोडक्यता तीन समने व दोन गोल अशी ही कामगिरी चाहत्यांना निराश करून गेली आहे. त्यामुळे स्लोव्हेनियाविरुद्धचा सामना बरोबरीत संपल्यानंतर चाहत्यांनी बीअरचे प्लास्टिक कप मैदानात फेकले.

तरीही इंग्लंडला किमान स्पेन, फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालचा सामना करावा लागणार नसून गटातील अव्वल संघ म्हणून पुढे गेल्यानंतर पुढील फेरीत तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्कृष्ट संघापैकी एकाशी त्याला खेळावे लागेल. या निकालामुळे स्लोव्हेनिया प्रथमच 16 संघांच्या फेरीत पोहोचला आहे आणि क्रोएशिया बाहेर पडला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article