इंग्लंड - ओमान लढतीवर पावसाचे सावट
वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड
नॉर्थ साउंड येथे होणार असलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडला विजय अत्यावश्यक असून त्यापैकी ओमानविरुद्धचा त्यांचा सामना आज गुरुवारी मध्यरात्री होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट पसरले असून पावसामुळे पुन्हा एकदा गतविजेत्या इंग्लंडची गाडी ऊळावरून घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या इंग्लंडही स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
स्कॉटलंडविऊद्धचा सामना पावसात वाहून गेल्याने दोन सामन्यांतून केवळ एक गुण झालेल्या इंग्लंडचा गट स्तरावरील अंतिम लढतीत नामिबियाशी सामना होईल. स्कॉटलंड (तीन सामन्यांतून 5 गुण) शर्यतीत पुढे असल्याने दोन्ही सामन्यातील विजय देखील इंग्लंडसाठी पुरेसे न ठरता राहू शकतात. ऑस्ट्रेलियावर विजय मिळविल्यास स्कॉटलंडचे सात गुण होऊ शकतात. त्यामुळे इंग्लंडच्या सुपर एटमध्ये पोहोचण्याच्या आशा अखेरीस त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतील.
सामन्याची वेळ : रात्री 12.30 वा. (भारतीय वेळेनुसार)