इंग्लंड पुरूष क्रिकेट संघांची घोषणा
वृत्तसंस्था/लंडन
सप्टेंबर महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका इंग्लंडमध्ये खेळविल्या जाणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने मंगळवारी दोन स्वतंत्र संघ जाहीर केले असून या संघांचे नेतृत्व जोस बटलरकडे सोपविण्यात आले आहे.
वनडे आणि टी-20 मालिकांसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंड संघामध्ये जेकॉब बेथेल, जोस हुल आणि @sन मोस्ले हे तीन नवे चेहरे आहेत. त्याच प्रमाणे इंग्लंड संघात ब्रिडॉन केर्सचे तीन महिन्यानंतर पुनरागमन झाले आहे.नवोदित गोलंदाज जॉन टर्नरलाही या दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. अनुभवी जॉनी बेअरस्टो, मोईन अली आणि ख्रिस जॉर्डन यांना मात्र या मालिकांसाठी इंग्लंडच्या निवड समितीने वगळले आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मार्क वूडला या मालिका हुकणार आहेत. विंडीज दौऱ्यावर गेलेला टॉम हार्टलेला या आगामी मालिकेसाठी वगळले आहे. या दोन्ही मालिकांसाठी इंग्लंडच्या निवड समितीने जोस बटलरवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. उभय संघात टी-20 चे तीन सामने, तर पाच वनडे सामने खेळविले जातील. 11 सप्टेंबरला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला टी-20 सामना होणार आहे. वेगवान गोलंदाज आर्चरला या दोन्ही मालिकांसाठी संधी देण्यात आली आहे.
इंग्लंड टी-20 संघ- जोस बटलर (कर्णधार), आर्चर, बेथेल, ब्रिडॉन केर्स, कॉक्स, सॅम करन, जोस हल, जॅक्स, लिव्हींगस्टोन, साकिब मेहमुद, डॅन मोस्ले, आदिल रशीद, फिल सॉल्ट, टॉप्ले, जॉन टर्नर
इंग्लंड वनडे संघ: जोस बटलर (कर्णधार), आर्चर, अॅटकिनसन, बेथेल, ब्रुक, केर्स, डकेट, जोस हल, जॅक्स, मॅथ्यु पॉटस्, आदिल रशीद, सॉल्ट, जेमी स्मिथ, टॉप्ले आणि टर्नर