For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंड आज श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्याच्या प्रयत्नात

06:00 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंड आज श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्याच्या प्रयत्नात
Advertisement

वृत्तसंस्था/कोलंबो

Advertisement

महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील साखळी सामन्यात आज शनिवारी इंग्लंड व श्रीलंका आमनेसामने येणार असून चार वेळचा विजेता इंग्लंड आपला विजयी सिलसिला वाढवण्याचा यावेळी प्रयत्न करेल, तर यजमान श्रीलंका स्पर्धेतील पहिला विजय मिळविण्यासाठी परिचित परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडने सलग दोन सामन्यांत विजय मिळविलेला असून दक्षिण आफ्रिकेवर त्यांनी दणदणीत विजय मिळवला. पण त्यानंतर बांगलादेशविऊद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची घसरगुंडी उडाली. 179 धावांचा पाठलाग करताना अर्धा संघ 78 धावांत परतला असला, तरी कर्णधार हीदर नाईटच्या नाबाद 79 धावांनी त्यांना विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या फलंदाजीची खोली आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा चार गड्यांनी विजय मिळवला असला, तरी कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने कबूल केले की, संघाने कमी अडचणींसह विजय पूर्ण करणे पसंत केले असते.

इंग्लंडच्या फिरकी त्रिकुटातील

Advertisement

अॅलिस कॅप्सी, सोफी एक्लेस्टोन आणि चार्ली डीन यांनी बांगलादेशविऊद्ध सात बळी घेतले, तर डावखुरी फिरकी गोलंदाज लिन्सी स्मिथ आणि मध्यमगती गोलंदाज लॉरेन बेल यांनीही प्रभावी योगदान दिले. मजबूत, अष्टपैलू संघासह इंग्लंडचे त्यांच्या आशियाई प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पारडे भारी राहील. चिंतेचा एकमेव विषय सलामीवीर टॅमी ब्युमाँटचा फॉर्म आहे, जिला सुऊवात करण्यात संघर्ष करावा लागला आहे. तथापि, तिची जोडीदार एमी जोन्स दक्षिण आफ्रिकेविऊद्ध नाबाद 40 धावा करताना चांगल्या लयीत दिसली आणि ही जोडी मजबूत पाया निर्माण करण्यास उत्सुक असेल. दरम्यान, श्रीलंका त्यांचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर परिचित परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्याची आशा करेल. भारताविऊद्धच्या पहिल्या सामन्यात यजमान संघाला चांगल्या सुऊवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागला.

नऊ फलंदाजांनी दुहेरी आकड्यातील धावसंख्या नोंदविली, पण एकही फलंदाज त्याहून पुढे सरकली नाही आणि संघाचा डाव 211 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार चमारी अटापट्टू ही श्रीलंकेच्या संधींची गुऊकिल्ली आहे. 2017 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविऊद्ध 143 चेंडूंत नाबाद 178 धावा काढलेली ही फलंदाज पुन्हा एकदा डावाच्या उभारणीची जबाबदारी सांभाळेल. श्रीलंकेच्या युवा प्रतिभावान खेळाडू हर्षिता समरविक्रमा, विश्मी गुणरत्ने आणि कविशा दिलहारी यांनी आशादायक कामगिरी केली आहे, तर अनुभवी गोलंदाज इनोका रणवीरा आणि उदेशिका प्रबोधनी यांना उर्वरित गोलंदाजांकडून अधिक पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे. मागील सामन्यात पावसाने खेळावर पाणी ओतल्याने दोन्ही संघ हवामानाच्या अंदाजावरही बारकाईने लक्ष ठेवतील.

सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.

Advertisement
Tags :

.