महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसरा वनडे सामना जिंकून इंग्लंडची मालिकेत बरोबरी

06:24 AM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विंडीज 5 गड्यांनी पराभूत, सामनावीर लिव्हिंगस्टोनचे नाबाद शतक, करन-बेथेल यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा

Advertisement

हंगामी कर्णधार लियाम लिव्हिंगस्टोनने फटकावलेले स्फोटक नाबाद शतक, फिल सॉल्ट व जेकब बेथेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या आधारे इंग्लंडने येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान विंडींजचा 5 गड्यांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 85 चेंडूत नाबाद 124 तडकावणाऱ्या लिव्हिंगस्टोनला सामनावीराचा बहुमान मिळाला. विंडीजच्या शाय होपचे शतक मात्र वाया गेले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर विंडीजचे सलामीवीर ब्रँडन किंग (7) व एव्हिन लेविस (4) झटपट बाद झाल्याने विंडीजची स्थिती 2 बाद 12 अशी झाली. केसी कार्टी व कर्णधार शाय होप यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करीत विंडीजचा डाव सावरला. संघाला त्यांनी 11.2 षटकांत अर्धशतकी तर 22.3 षटकांत शतकी मजल मारून दिली. होपने 66 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यात 4 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. कार्टीनेही वनडेतील चौथे अर्धशतक 62 चेंडूत पूर्ण करताना 4 चौकार मारले. 30 व्या षटकांत विंडीजचे दीडशतक फलकावर लागले. कार्टी व होप यांची 143 धावांची भागीदारी आदिल रशिदने संपुष्टात आणली. त्याने कार्टीला त्रिफळाचीत केले. कार्टीने 77 चेंडूत 71 धावा जमविताना 5 चौकार, 1 षटकार मारला. 30.2 षटकांत विंडीजने 3 बाद 155 धावा जमविल्या होत्या.

शेरफेन रुदरफोर्डने होपला चांगली साथ दिली आणि 36 षटकांत संघाला 200 धावांची मजल मारून दिली. रुदरफोर्डने जास्त आक्रमक फटकेबाजी करीत 36 चेंडूतच 4 चौकार, 3 षटकारांसह 54 धावा तडकावल्या. त्याचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. या दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोनने त्याला बाद केले. 40 व्या षटकांत विंडीजने 4 बाद 234 धावा जमविल्या होत्या तर 42 व्या षटकात अडीचशेचा टप्पा गाठला. शाय होपने 17 वे वनडे शतक 118 चेंडूत पूर्ण केले. त्याचा 6 चौकार, 3 षटकारांचा समावेश होता. शिमरॉन हेटमायरने जलद खेळी करताना 11 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 24 धावा फटकावल्या. पण होप सहाव्या गड्याच्या रूपात बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चरने 117 धावांवर बाद केले. 127 चेंडूत त्याने 8 चौकार, 4 षटकार ठोकले.

विंडीजने यावेळी 47 षटकांत 6 बाद 297 धावांची मजल मारली होती. रॉस्टन चेस (22 चेंडूत नाबाद 20), मॅथ्यू फोर्ड (11 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 23) यांच्या फटकेबाजीमुळे विंडीजला 50 षटकांत 6 बाद 328 धावांचा टप्पा गाठता आला. इंग्लंडच्या टर्नरने 42 धावांत 2, रशिदने 62 धावांत 2 बळी टिपले तर लिव्हिंगस्टोन व आर्चर यांना एकेक बळी मिळाले.

329 धाव।ंच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. विल जॅक्स 12 तर जॉर्डन कॉक्स 4 धावा काढून बाद झाले. पण फिल सॉल्टने दुसऱ्या बाजूने जोरदार फटकेबाजी करीत बेथेलसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी करून 19 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. सॉल्ट 59 चेंडूत 59 धावा काढून बाद झाला. त्यात 8 चौकारांचा समावेश होता. जॅक्सला बाद करणाऱ्या फोर्डने त्याला बाद केले. बेथेलने पहिले वनडे अर्धशतक 51 चेंडूत पूर्ण केले. सील्सच्या एका अप्रतिम झेलवर तो 55 धावांवर बाद झाला. लिव्हिंगस्टोनसमवेत त्याने 53 धावांची भागीदारी केली.

सॅम करन व लिव्हिंगस्टोन यांनी चौफेर फटकेबाजी करीत 105 चेंडूत 140 धावांची भागीदारी केली. फोर्डने ही जोडी फोडताना करनला 52 चेंडूत 52 धावांवर बाद केले. 46 व्या षटकांत इंग्लंडने त्रिशतक गाठले. विजय आवाक्यात आल्यानंतर लिव्हिंगस्टोनने षटकारांची आतषबाजी सुरू केली आणि 85 चेंडूत नाबाद 124 धावा झोडपत विजय साकार केला. त्याच्या खेळीत 5 चौकार व 9 षटकारांचा समावेश होता. मोसली 4 धावांवर नाबाद राहिला. विंडीजचे फोर्डने 3, शमार जोसेफ व चेस यांनी एकेक बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 50 षटकांत 6 बाद 328 : कार्टी 71, होप 117, रुदरफोर्ड 36 चेंडूत 54, हेटमायर 11 चेंडूत 24, चेस नाबाद 20, फोर्ड नाबाद 23, अवांतर 8. टर्नर 2-42, रशिद 2-62, लिव्हिंगस्टोन 1-56, आर्चर 1-40. इंग्लंड 47.3 षटकांत 5 बाद 329 : सॉल्ट 59, बेथेल 55, लिव्हिंगस्टोन 85 चेंडूत नाबाद 124 (5 चौकार, 9 षटकार), सॅम करन 51, अवांतर 19, मॅथ्यू फोर्ड 3-48, शमार जोसेफ 1-72, रॉस्टन चेस 1-53.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media#tarunharat
Next Article