इंग्लंडची विजयासह मालिकेत बरोबरी
वृत्तसंस्था /नॉर्थ साऊंड
विंडीजच्या डावामध्ये कर्णधार शाय होपने तसेच रुदरफोर्डने अर्धशतके झळकवली. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची एकूण स्थिती 7 षटकात 4 बाद 23 अशी केविलवानी होती. त्यानंतर कर्णधार ह होप आणि रुदरफोर्ड यांनी पाचव्या गड्यासाठी 129 धावांची भागिदारी केल्याने. विंडीजला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडच्या लिविंगस्टोनने रुदरफोर्डला बाद केल्यानंतर विंडीजच्या तळाच्या फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. त्यांचे शेवटचे पाच गडी 50 धावात तंबूत परतले. कर्णधार होपने 68 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 68 तर रुदरफोर्डने 80 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 63 धावा जमविल्या. किंगने 3 चौकारांसह 17, शेफर्डने 4 चौकारांसह 19, जोसेफने 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 2 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे सॅम करणने 33 धावात 3, लिविंगस्टोनने 39 धावात 3, अॅटकिनसनने 28 धावात 2 तसेच रेहान अहमदने 40 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सॉल्ट आणि विल जॅक्स या सलामीच्या जोडीने इंग्लंड संघाच्या डावाला बऱ्यापैकी सुरूवात करुन देताना 35 चेंडूत 50 धावांची भागिदारी केली. विंडीजच्या शेफर्डने सॉल्टचा 6 व्या षटकात त्रिफळा उडविला. त्याने 15 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. दरम्यान इंग्लंडने यानंतर आपले 2 फलंदाज लवकर गमविले. विंडीजच्या मोतीने क्रॉलेचा 3 धावावर त्रिफळा उडविला तर मोतीने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना डकेटला होपकरवी झेलबाद केले. त्याने 3 धावा केल्या. जॅक्स आणि ब्रूकने चौथ्या गड्यासाठी 31 धावांची भागिदारी केली. रुदरफोर्डने जॅक्सला पायचीत केले. त्याने 72 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 73 धावा झळकावल्या. विंडीजला मिळालेले हे शेवटचे यश ठरले. हॅरी ब्रूक आणि कर्णधार बटलर यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. ब्रूकने 49 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 43 तर कर्णधार बटलरने 45 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 58 धावा जमविल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 13 षटकात अभेद्य 90 धावांची भागिदारी केली. इंग्लंडने 32.5 षटकात 4 बाद 206 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला. विंडीजतर्फे मोतीने 2 तर शेफर्ड आणि रुदरफोर्ड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या डावात 9 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 39.4 षटकात सर्व बाद 202 (शाय होप 68, रुदरफोर्ड 63, शेफर्ड 19, जोसेफ 14, किंग 17, सॅम करण 3-33, लिविंगस्टोन 3-39, अॅटकिनसन 2-28, रेहान अहमद 2-40). इंग्लंड 32.5 षटकात 4 बाद 206 (सॉल्ट 21, जॅक्स 73, क्रॉले 3, डकेट 3, ब्रुक नाबाद 43, बटलर नाबाद 58, अवांतर 5, मोती 2-34, शेफर्ड 1-27,