कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड- आयर्लंड महिलांची वनडे मालिका सप्टेंबरमध्ये

06:14 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / लंडन

Advertisement

आयसीसीनुसार इंग्लंड महिला पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आयर्लंड महिला संघाचे यजमानपद भूषवणार आहे. दोन्ही संघ तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेत आमनेसामने येतील. जी आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील चक्राचा भाग असेल.

Advertisement

पुढील वर्षी इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषक संपल्यानंतर लवकरच ही मालिका होईल. ज्यामध्ये सामने लेस्टर, डर्बी आणि वॉर्सेस्टर येथे होणार आहेत. आयर्लंड यावर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा भाग नसला तरी 2026 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा वापर त्यांना 2029 च्या स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यासाठी करण्याची आशा आहे.

मालिकेचे वेळापत्रक

पहिला एकदिवशीय सामना- 1 सप्टेंबर- लेस्टर

दुसरा एकदिवशीय सामना - 3 सप्टेंबर -डर्बी

तिसरा एकदिवशीय सामना- 6 सप्टेंबर-वॉर्सेस्टर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article