उपांत्य फेरीत आज दक्षिण आफ्रिकेपुढे इंग्लंडचे खडतर आव्हान
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या आज बुधवारी येथे होणाऱ्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला चार वेळच्या विजेत्या इंग्लंडचा सामना करावा लागेल तेव्हा त्यांना फिरकी गोलंदाजांविऊद्धची फलंदाजीतील कमतरता दूर करण्याची आणि अष्टपैलू कामगिरी करण्याची आशा असेल. बाद फेरीत जाताना दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे पराभव पत्करावे लागले आणि दोन्ही वेळा फिरकी गोलंदाजांविऊद्ध त्यांची फलंदाजी कोसळली. पहिल्या सामन्यात 69 धावांवर गारद झाल्यानंतर निराश झालेल्या दक्षिण आफ्रिकी संघाने न्यूझीलंड, भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानवर कमी फरकाने, पण निर्धाराने विजय मिळविले.
तथापि, ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात फिरकी गोलंदाजांविऊद्धचा त्यांचा संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला. ऑस्ट्रेलियाने त्यांना 24 षटकांत केवळ 97 धावांत गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना इंग्लंडविऊद्ध फिरकी गोलंदाजांचे चेंडू ओळखता आले नाहीत, तर ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या सामन्यात अलाना किंगच्या लेगस्पिनने त्यांना पूर्णपणे धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेच्या या कमकुवत दुव्याचा पुन्हा फायदा घेण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्याच्या बाबतीत ते केवळ त्यांच्या अष्टपैलू ताकदीवरच नव्हे, तर सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ आणि चार्ली डीन या फिरकी त्रिकुटावरही अवलंबून राहतील.
वेगवान गोलंदाज लॉरेन बेलला सुऊवातीला दबाव आणावा लागेल, तर पाच बळी घेतलेली अॅलिस कॅप्सी चांगल्या लयीत आहे. तथापि, गेल्या सामन्यात दुखापत झाल्यानंतर एक्लेस्टोनच्या सामन्यासाठी उपलब्धतेबद्दल चिंता आहे. रविवारी न्यूझीलंडविऊद्ध क्षेत्ररक्षण करताना ती गोलंदाजी करायच्या खांद्यावर भार टाकून पडली होती. इंग्लंड एक्लेस्टोन खेळण्यासाठी तंदुऊस्त होईल याबद्दल आशावादी आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वोल्वार्डने सात सामन्यांमध्ये 50.16 च्या सरासरीने 301 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु वोल्वार्ड वगळता दक्षिण आफ्रिकेच्या फारच कमी फलंदाजांनी सातत्यपूर्ण फॉर्म दाखवला आहे. इंदूरमध्ये भारताविऊद्ध 101 धावा काढणारी तझमिन ब्रिट्स त्यानंतर तीन वेळा शून्यावर, तर एकदा 55 वर आणि एकदा 6 वर बाद झालेली आहे, ज्यामुळे तिचा डळमळीत फॉर्म अधोरेखित झाला आहे. तरीही दक्षिण आफ्रिकेला ती चांगली सुऊवात करून देईल अशी आशा असेल.
सून लुस (157 धावा) आणि मॅरिझान कॅप (162) या देखील सातत्यहीन राहिल्या आहेत, ज्यामुळे संघाच्या फलंदाजीतील संघर्षात भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यांनी केलेली काही फटक्यांची निवड शंकास्पद होती आणि त्यांना इंग्लंडविऊद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे इंग्लंड उच्च दबावावाच्या या सामन्यात भरपूर आत्मविश्वासाने उतरेल. याच ठिकाणी त्यांच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी 10 गडी राखून पराभव केला होता. पहिल्या उपांत्य सामन्याच्या दिवशी गुवाहाटीत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने संघांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतील. जरी राखीव दिवस असला, तरी निकाल न लागल्यास गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.