महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंडचा पाकवर 93 धावांनी विजय

06:56 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्टोक्स, बेअरस्टो, रूट यांची दमदार अर्धशतके, सामनावीर विलीचे तीन बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील येथील इडन गार्डन्स मैदानावर शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लंडने पाकचा 93 धावांनी दणदणीत पराभव केला. इंग्लंडने पाकला विजयासाठी 338 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडतर्फे स्टोक्स, रूट आणि बेअरस्टो यांनी दमदार अर्धशतके झळकवली. त्यानंतर पाकचा डाव 43.3 षटकात 244 धावात संपुष्टात आला. या स्पर्धेतील हा औपचारीक सामना होता. इंग्लंड आणि पाक या दोन्ही संघांचे उपांत्य फेरीसाठीचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे.

इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफिक विलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर विलीने आणखी एक धक्का देताना फक्र झमानला एका धावेवर स्टोक्सकरवी झेलबाद केले. कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. अॅटकिनसनने बाबर आझमला रशिदकरवी झेलबाद केले. त्याने 45 चेंडूत 6 चौकारांसह 38 धावा जमविल्या. मोईन अलीने मोहम्मद रिझवानचा त्रिफळा उडविला. त्याने 51 चेंडूत 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. रिझवान बाद झाल्यानंतर शकिलने 37 चेंडूत 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. रशिदच्या फिरकीवर त्याचा त्रिफळा उडाला. शकिलने 37 चेंडूत 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. पाकची यावेळी स्थिती 57.5 षटकात 5 बाद 126 अशी होती. मोईन अलीने इफ्तिकार अहमदला 3 धावावर झेलबाद केले. रशिदने शदाब खानचा 4 धावावर त्रिफळा उडविला. शाहिन आफ्रिदीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावा केल्या. आगा सलमानने टिच्चून फलंदाजी करत 45 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51 धावा जमविल्या. विलीने त्याला झेलबाद केले. पाकने 37.4 षटकात 9 बाद 191 धावा जमविल्या होत्या. मोहम्मद वासिम आणि हॅरिस रौफ यांनी शेवटच्या काही षटकात आक्रमक फटकेबाजी केली. रौफने 23 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा केल्या. वोक्सच्या गोलंदाजीवर रौफ उत्तुंग फटका मारण्याच्या नादात स्टोक्सकरवी झेलबाद झाला. या जोडीने शेवटच्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केल्याने पाकला 244 धावांपर्यंत मजल मारता आली. वासिमने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 16 धावा केल्या. इंग्लंडतर्फे विलीने 56 धावात 3, आदिल रशिदने 55 धावात 2, मोईन अलीने 60 धावात 2 तर वोक्सने 27 धावात 1 गडी बाद केला. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 72 धावा जमविल्या.

 

तत्पुर्वी या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मलान आणि बेअरस्टो यांनी सलामीच्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 72 धावा झोडपल्या. पाकच्या इफ्तिकार अहमदने मलानला झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 31 धावा जमविल्या. त्यानंतर बेअरस्टो रौफच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. बेअरस्टोने 61 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 59 धावा जमविल्या. इंग्लंडचे शतक 97 चेंडूत फलकावर लागले.

बेन स्टोक्स आणि रूट यांनी संघाच्या धावसंख्येला चांगला आकार देताना तिसऱ्या गड्यासाठी 152 धावांची भागिदारी केली. स्टोक्सने 76 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 84 धावा जमविल्या. तर रूटने 4 चौकारांसह 60 धावा केल्या. कर्णधार बटलरने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27, ब्रूकने 17 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30, विलीने 5 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. मोईन अलीने 1 षटकारासह 8 तर व्होक्सने 4 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 8 षटकार आणि 35 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे हॅरिस रौफने 64 धावात 3, शाहिन आफ्रिदीने 72 धावात 2, मोहम्मद वासिमने 74 धावात 2, अॅटकिनसनने 45 धावात 2 तसेच इफ्तिकार अहमदने 38 धावात 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकात 9 बाद 337 (स्टोक्स 84, रूट 60, बेअरस्टो 59, मलान 31, बटलर 27, ब्रूक 30, विली 15, अवांतर 19, रौफ 3-64, शाहिन आफ्रिदी 2-72, मोहम्मद वासिम 2-74, इफ्तिकार अहमद 1-38), पाकिस्तान 43.3 षटकात सर्व बाद 244 (आगा सलमान 51, बाबर आझम 38, मोहम्मद रिझवान 36, सौद शकिल 29, शाहिन आफ्रिदी 25, हॅरिस रैफ 35, मोहम्मद वासिम नाबाद 16, अवांतर 6, विली 3-56, आदिल रशिद 2-55, मोईन अली 2-60, अॅटकिनसन 2-45, वोक्स 1-27).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article