कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंडची बांगलादेशवर मात

02:06 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीसी महिला वनडे विश्वचषक :  सामनावीर हीदर नाईटची अर्धशतकी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

Advertisement

आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने बांगलदेशविरुद्ध सामना अगदी सहज जिंकत यंदाच्या हंगामात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना 178 धावा केल्या. विजयासाठीचे लक्ष्य इंग्लंडने सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. नाबाद 79 धावांची खेळी साकारणाऱ्या इंग्लंडच्या हीदर नाईटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली.  धावफलकावर अवघ्या 6 धावा असताना सलामीची बॅटर एमी जोन्स पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर बाद झाली. टॅमी ब्युमाँटच्या रुपात बांगलादेशने इंग्लंडला 29 धावांवर दुसरा धक्का दिला. तिने 17 चेंडूत 13 धावा केल्या. यानंतर हेदर नाइटने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटच्या साथीने डाव सावरला. ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. हीदरने 111 चेंडूत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 79 धावांची नाबाद खेळी करत संघाला 23 चेंडू आणि 4 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

 बांगलादेशच्या फलंदाजांची निराशा

प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 49.4 षटकांत 178 धावांत ऑलआऊट झाला. सोभनाने सर्वाधिक 60 धावांचे योगदान दिले तर याशिवाय राबेया खानने नाबाद 43 धावांचे योगदान दिले. इतर महिला फलंदाजांनी निराशा केल्यामुळे बांगलादेशला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, इंग्लंडचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला आहे.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश 49.4 षटकांत सर्वबाद 178 (सोभना 60, राबेया खान नाबाद 43, सोफी इक्लेस्टोन 3 बळी, लिन्से स्मिथ 2 बळी, चार्ली डीन आणि एलिस केप्सी प्रत्येकी 2 बळी).

इंग्लंड 46.1 षटकांत 6 बाद 182 (हीदर नाईट नाबाद 79, नॅट ब्रंट 32, चार्ली डीन नाबाद 27, फहिमा खातुन 3 बळी, मरुफा अख्तर 2 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article