इंग्लंड, अफगाणसमोर आज आव्हान जिवंत ठेवण्याचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ लाहोर
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आज बुधवारी येथे होणाऱ्या महत्त्वाच्या गट ‘ब’ सामन्यात धोकादायक अफगाणिस्तानचा सामना करताना इंग्लंडसमोर स्पर्धेतील आपल्या आशा जिवंत ठेवण्याचे आव्हान असेल. येथे पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न धोक्यात येईल. कारण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने आधीच दोन गुण मिळवले आहेत.
इंग्लंडचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचे दिवस आता खूप मागे पडले आहेत. या माजी विश्वविजेत्या संघाला त्यांच्या स्पर्धेच्या सुऊवातीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविऊद्ध 350 पेक्षा जास्त धावांचा बचावही करता आला नाही. इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाल्याने काहीसा दिलासा मिळू शकतो. परंतु ही कामगिरी प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्याविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाविऊद्ध नोंदली गेली. त्यानंतर जखमी मिशेल मार्श आणि निवृत्त झालेला मार्कस स्टोइनिस यासारखे प्रमुख फलंदाज नसूनही इंग्लिश गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघाला रोखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे इंग्लंडला अफगाणिस्तानविऊद्ध दोन्ही बाबतीत मोठी सुधारणा दाखवावी लागेल.
अफगाणिस्तानच्या तीन फिरकी गोलंदाजांमध्ये रशिद खान, नूर अहमद आणि मोहम्मद नबी यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे सर्वोत्तम फलंदाजांनाही त्रास देण्याची क्षमता आहे आणि इंग्लंडच्या फलंदाजांची अलीकडच्या काळातील फिरकीविरुद्धची कामगिरी ही त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी नाही. इंग्लंडलाही धक्का बसला आहे, कारण अष्टपैलू ब्रायडन कार्सला पायाच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यांच्या फिरकी विभागाला बळकटी देण्यासाठी त्याच्या जागी लेगस्पिनर रेहान अहमदला संघात स्थान देण्यात आले आहे. या निर्णयामुळे आदिल रशिदला योग्य साथ मिळेल. कारण आतापर्यंत लियाम लिव्हिंगस्टोन ऑफस्पिन, लेगस्पिन आणि सीमअप चेंडूंचे मिश्रण साधत ती भूमिका बजावत होता.
परंतु इंग्लंडची खरी समस्या सलामीवीर फिल सॉल्ट आणि मधल्या फळीतील हॅरी ब्रूक यांच्या खराब फॉर्ममध्ये आहे. सॉल्टचे ‘वनडे’मधील एकमेव शतक 2022 मध्ये नोंदले गेले होते आणि तेव्हापासून त्याला त्याच्या चांगल्या सुऊवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आलेले नाही. अनेकदा जलद 30 किंवा 40 धावा करून तो बाद झालेला आहे. ब्रूकची देखील अशीच कहाणी आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या घरच्या वनडे सामन्यात यॉर्कशायरचा हा खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये होता. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती. तथापि, भारत दौऱ्यापासून ब्रूकला फिरकी गोलंदाजांना खेळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. गेल्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम झॅम्पाविऊद्ध बाद झाला. आता 26 वर्षीय ब्रूकला अफगाणिस्तानविऊद्ध तीन उच्च दर्जाच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागेल.
दुसरीकडे, अफगाणिस्तान सुऊवातीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने केलेल्या 107 धावांच्या धमाकेदार पराभवानंतर मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानकडे आवश्यक प्रतिभा आहे परंतु इंग्लिश संघ कमकुवत असला, तरी त्याला आव्हान देण्याच्या दृष्टीने त्यांना सारी शक्ती योग्यरीत्या वापरावी लागेल.
संघ: अफगाणिस्तान-हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रेहमानुल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदीन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशिद खान, नांगयाल खरोती, नूर अहमद, फजलहक फाऊकी, फरिद मलिक, नावीद झदरन, राखीव-दरविश रसूली, बिलाल सामी.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, रेहान अहमद, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, ज्यो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वूड.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वा.