महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयआयटीमध्ये आता हिंदीत इंजिनियरिंगचे शिक्षण

06:29 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बीटेकमध्ये याच वर्षापासून सुविधा लागू : 11 भाषांमध्ये मिळणार पुस्तके

Advertisement

वृत्तसंस्था/ जोधपूर

Advertisement

भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) आता इंजिनियरिंगचे शिक्षण हिंदीतही सुरू होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आयआयटी जोधपूरमध्ये चालू शैक्षणिक सत्रापासूनच हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बीटेक पहिल्या वर्षासाठी अभ्यास क्रम सुरू करणार आहे. हा नवा पुढाकार स्वत:च्या मातृभाषेत विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिक्षण घेता यावे याकरता घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

जे शिक्षक इंग्रजी विभागाला शिकवतील, तेच हिंदीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. यामुळे निरंतरता आणि गुणवत्ता कायम राहणार आहे. आयआयटी जोधपूरमध्ये अधिक समावेशक आणि सहाय्यक शैक्षणिक वातावरणाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या शिफारसींनुसार विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. परंतु अद्याप बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रमांची निवड करत आहेत.

2021-22 मध्ये प्रादेशिक भाषांच्या माध्यमातून बॅचलर ऑफ इंजिनियरिंग (बीई) आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलोजी (बीटेक) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 245 होती, 2022-23 मध्ये हे प्रमाण वाढून 683 झाले आहे. मागील दोन वर्षांमध्ये एक हजारपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषांची निवड करत इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे, परंतु हळूहळू ही संख्या वाढतत आहे.

आयआयटी जोधपूरने हिंदीमधून बीटेकचे शिक्षण घेण्याचा पर्याय दिला आहे. हिंदी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकेही पुरविण्यात येणार आहेत. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेकडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुरुप विविध प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनियरिंगची पुस्तके तयार केली जात आहेत. हिंदी आणि अन्य 11 प्रादेशिक भाषांमध्ये ज्यात तमिळ, तेलगू, उर्दू, मल्याळी, बंगाली, आसामी, मराठी, कन्नड, उडिया, गुजराती आणि पंजाबीमध्ये बीटेक आणि बीई अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली जात आहेत.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article