For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ब्राह्मोस’चा माजी अभियंता निशांत अग्रवालला जन्मठेप

06:09 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ब्राह्मोस’चा माजी अभियंता निशांत अग्रवालला जन्मठेप
Advertisement

 पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याचे स्पष्ट

Advertisement

► वृत्तसंस्था/ नागपूर

ब्राह्मोस एरोस्पेसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’साठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून नागपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निशांत अग्रवाल याला 14 वर्षांची सक्तमजुरी आणि 3 हजार ऊपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी याप्रकरणी सोमवारी निकाल जाहीर केला. अग्रवाल याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 235 अन्वये शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीने केलेला गुन्हा आयटी कायद्याच्या कलम 66 (एफ) आणि अधिकृत गुप्तता कायदा (ओएसए) अंतर्गत दंडनीय आणि शिक्षेस पात्र असल्याचे  न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले आहे.

Advertisement

नागपुरातील कंपनीच्या क्षेपणास्त्र केंद्राच्या तांत्रिक संशोधन विभागात काम करणाऱ्या अग्रवालला 2018 मध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या लष्करी गुप्तचर आणि दहशतवादविरोधी पथकांनी (एटीएस) संयुक्त कारवाईत अटक केली होती. याप्रकरणी त्याच्यावरील हेरगिरीचे आरोप सिद्ध झाले आहेत. न्यायालयाने अग्रवाल याला अधिकृत गुपित कायद्यांतर्गत जन्मठेपेसह 14 वर्षांच्या सश्र्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला 3,000 ऊपयांचा दंड ठोठावल्याचेही सरकारी वकील ज्योती वजानी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.