महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंजिनियर आहे, काम करणे जमते!

05:49 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानात केजरीवालांचा आप उमेदवारांसाठी प्रचार

Advertisement

राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल देखील सामील झाले. केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील थानागाजीमध्ये रोड शो केला आहे. येथे त्यांनी आप उमेदवार कैलास मीणा यांच्या समर्थनार्थ मते मागितली आहेत. मी इंजिनियर आहे, मला काम करणे जमते, राजकारण तितके जमत नसल्याचे उद्गार काढले आहेत. जर तुम्हाला भ्रष्टाचार आणि राजकारण नको आल्यास आम आदमी पक्षाला मतदान करा. मुलांसाठी चांगल्या शाळा आणि रुग्णालये हवी असल्यास आम्हाला मत द्या. स्वत:च्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशी इच्छा असल्यास आम आदमी पक्षाला मतदान करा. 10 वर्षांमध्ये आमच्या पक्षाने दोन राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे. आम्ही काही तरी चांगले केले आहे, याचमुळे हे शक्य झाले आहे. दिल्ली-पंजाबच्या लोकांकडून आमच्या पक्षाबद्दल जाणून घ्या, त्यांनी आमच्या पक्षाचे कौतुक केले तरच आम्हाला मतदान करा असे आवाहन केजरीवालांनी रोड शोवेळी केले आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#Political#social media
Next Article