12 हजार वर्षांपासून ऊर्जेचा होतोय संग्रह
कॅनडात भयंकर भूकंप होण्याची भीती
कॅनडाच्या भूमीखाली एक असे ठिकाण आहे, जे लाखो वर्षांपासून दबाव जमा करत आहे. अलिकडेच वैज्ञानिकांनी यूकोन भागात ‘टिंटिना फॉल्ट’ नावाची अशी रेषा शोधली आहे, जी 7.5 तीव्रतेचा भूकंप घडवू शकते. टिंटिना फॉल्ट एक लांब रेषा असून ती युकोनपासून सुरू होत अलास्कापर्यंत जाते. याची लांबी सुमारे 1 हजार किलोमीटर आहे. ही ब्रिटिश कोलंबियातून जात अन्य दुसऱ्या मोठ्या रेषेला जोडली जाते, जी दक्षिण कॅनडात खोरे निर्माण करते. लाखो वर्षांपूर्वी ही रेषा खूपच हलत होती, परंतु मागील 12 हजार वर्षांपासून शांत आहे.
का धोकादायक?
हा फॉल्ट हळूहळू दबाव जमा करत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. मागील 26 लाख वर्षांमध्ये याच्या दोन्ही बाजू 1 हजार मीटरने सरकल्या आहेत. हा फॉल्ट दरवर्षी काहीसा हलतो. आता दबाव इतका झाला आहे की 7.5 तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो. हा भूकंप कुठल्याही क्षणी घडू शकतो. हे जुने कमकुवत स्थळ असून ते पृथ्वीच्या दबावाल साठवते आणि यातून अचानक ऊर्जा बाहेर पडू शकते असे वैज्ञानिक थेरॉन फिनले यांनी सांगितले आहे.
वैज्ञानिकांनी उपग्रह आणि लिडार (जे जंगलाखालील भूमी दाखविते)चा वापर केला. त्यांनी जमिनीवर उंच ठिकाणं (स्कार्प्स) पाहिले, जे जुन्या भूकंपाच्या खुणा आहेत. बर्फाच्या खुणांमधून हे 12 हजार वर्षांपूर्वी, 1.32 लाख वर्षांपूर्वी आणि 26 लाख वर्षांपूर्वी हलले असल्याचे कळले. आता 6 मीटरचा दबाव साचला असून तो भूकंपासाठी पुरेसा आहे.
किती मोठा धोका
हा भूकंप छोटी गावं म्हणजेच डॉसन सिटीला (1600 लोकांचे वास्तव्य) नुकसान पोहोचवू शकतो. खाणी अन् पर्वतीय क्षेत्रांमध्ये भूस्खलनाचा धोका आहे. परंतु हा भाग पूर्वीपासून भूकंपप्रवण मानला जात असल्याने याला मोठा धोका मानले जात नाही. तरीही खबरदारी आवश्यक आहे.
कधी घडणार भूकंप
हा भूकंप कधी घडेल हे कुणालाच सांगता येणार नाही. हा भूकंप होण्यासाठी कदाचित अनेक वर्षे लागू शकतील. वैज्ञानिकांना फॉल्टमध्ये ख•s खणून जुन्या भूकंपाविषयी माहिती मिळवावी लागणार आहे.