जिल्ह्याच्या राजकारणाला आटपाडीतून उर्जा
आटपाडी :
जिल्ह्यातील युवकांनी परिवर्तनाच्या बाजुने कौल देत गत निवडणुकीत दिशादर्शक म्हणुन भुमिका बजावली. आता जिल्ह्यातील सकारात्मक राजकारणाला आटपाडीतून उर्जा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते तथा इस्लामपुरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले यांनी व्यक्त केला.
आटपाडीमध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी सुरू केलेल्या व्यायामशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. भारततात्या पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राजेंद्र खरात, शहाजी जाधव, महादेव जुगदर, विपुल कदम, लक्ष्मण कदम, प्रवीण माने, चंद्रकांत पाटील, बबन शिरतोडे, विशाल चव्हाण, संतोष पवार, दादासाहेब पाटील, राहुल कुंभार, बाळासो हाके, ज्ञानेश्वर पवार, अमोल नांगरे, यलाप्पा पवार, प्रशांत जाधव, विशाल नागणे, किरण काळे, मधुकर होळे, नरेंद्र दीक्षित, सुशांत सावत, ओंकार दुबोले, विजय जाधव, विशाल कांबळे, स्वप्निल हाके, समाधान शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, तरूणाईच्या संख्येमुळे विकासात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जिह्यामधील युवक वेगळ्या विचारसरणीचे आहेत. युवकांनी ठरविल्याने जिह्यामध्ये परिवर्तन झाले. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन आपण परिवर्तनाची लढाई लढण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात युवकांना मोठी संधी आहे. मी भाजपा जिल्हाध्यक्ष असताना अनिल पाटील यांनी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळले. अनिल पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्त्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे रहावे. युवा कल्याणासाठी त्यांचे नेतृत्त्व जपा आणि वाढविण्यासाठी आशिर्वाद द्या. जिल्ह्यात हा युवा नेता आपली कर्तबगारी निश्चितच सिध्द करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गोरगरीबांच्या कल्याणासाठी धावून जाणारे व्यक्तीमत्त्व म्हणुन आरोग्यदूत निशिकांतदादा सर्वदुर परिचित आहेत. त्यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करताना मला प्रोत्साहन दिले. निशिकांतदादांमुळे मला कामाची मोठी संधी मिळाली. येणाऱ्या कालावधीत आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार केल्याचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी जाहीर केले.
याप्रसंगी विजय पाटील, ऋषिकेश पाटील, सतीश मुढे, विकी दौंडे, सौरभ नवले, दीपक जाधव, आप्पासो जाधव, मिनीनाथ चव्हाण, दुर्गेश दांडेकर, गोपी पवार, दादासाहेब वाघमारे, विजय बनसोडे, सतीश मुढे, मधुसूदन लोखंडे, बंडू सरगर, चंदु हाके, विनायक जानकर, सचिन ऐवळे, निखिल गळवे, सचिन मंडले, करण मंडले, दत्ता होळे, दिनेश सरगर, शशी हाके, दादासाहेब वाघमारे, प्राण चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- नवी राजकीय इनिंग
सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली सुरू आहेत. इस्लामपुरचे नेते निशिकांत भोसले-पाटील हे सध्या अजितदादा गटात आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील हे देखील हातात ‘घड्याळ’ बांधणार असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील माजी आमदारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या बैठकीतही ते सहभागी होते. त्यामुळे राष्ट्रवादी प्रवेशाच्या अनुषंगाने भोसले-पाटील यांचा आटपाडीत झालेला कार्यक्रम नव्या राजकीय इनिंगचा श्रीगणेशा ठरला आहे.