महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मतदानाची सांगता...गणनेची उत्सुकता

06:16 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची सांगता शनिवारी झाली आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे, ती मतगणनेची. येत्या मंगळवारी, अर्थात 4 जून 2024 या दिवशी प्रात:काळी 8 वाजल्यापासून मतगणनेच्या कार्याचा प्रारंभ देशभरातील विविध मतगणना केंद्रांवर होणार आहे. त्याच दिवशी दोनप्रहरी 12 वाजेपर्यंत कोणाचा विजय होणार, यासंबंधीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेले सलग 53 दिवस ‘दैनिक तरुण भारत’ने या लोकसभा निवडणुकीच्या सर्व अंगोपांगांची माहिती वाचकांपर्यंत पोहचविणारे ‘मतसंग्राम 2024’ हे एक पृष्ठाचे सदर सादर केले आहे. या सदराचीही आज रविवारी सांगता होत आहे. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी गाजली. प्रत्येक राजकीय पक्षाने आणि आघाड्यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. असंख्य प्रचारसभा, रोड शोज, कोपरा सभा, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, शोभायात्रा, आश्वासने, आरोप-प्रत्यारोप, वादग्रस्त विधाने आदि सर्वांचा आधार मतदारांना आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित करण्यासाठी घेण्यात आला. धर्म, भगवान रामलल्लांचे अयोध्येत साकारले जाणारे भव्य मंदीर, बेरोजगारी, महागाई, गॅरेंटी, जात, जातसर्वेक्षण, खासगी मालमत्ता सर्वेक्षण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा विकास, देशाची सुरक्षा, भारतारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा इत्यादी विविध मुद्दे राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार आणि विचारसरणीनुसार  उतयोगात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा आणि अनेक केंद्रीय मंत्री यांनी भारतीय जनता पक्षाचा जोरदार प्रचार केला. तर राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे इत्यादी नेत्यांनी काँग्रेसचा प्रचार केला. भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांची आघाडी यांचे इतर प्रमुख नेतेही प्रचारकार्यात सर्वार्थाने सहभागी झाले. प्रत्येक पाच वर्षांनी येणारा हा गणतंत्र महोत्सव देशातील 140 कोटी नागरीकांनी आणि त्यांच्यातील साधारणत: 97 कोटी मतदारांनी मन:पूत साजरा केला, अनुभवला आणि शक्य तेव्हढ्या प्रमाणात ते या महोत्सवात सहभागीही झाले. जगातील सर्वात मोठे गणतंत्र असणाऱ्या भारत देशातील या गणतंत्र सोहळ्याकडे साऱ्या जगाचेही सूक्ष्म लक्ष होते. ही सर्व रणधुमाळी आता शांत झाली आहे. सर्व संबंधित यशापयशाच्या संख्यानुमानात मग्न आहेत. अर्थात, 4 जूनची मतगणना आणि नंतर सरकारची स्थापना झाल्यानंतरच हा दिव्य सोहळा खऱ्या अर्थाने समाप्त होईल. तत्पूर्वी या  अंतिम सदरात या लोकसभा निवडणुकीच्या रागरंगाचा हा संक्षिप्त आढावा....

Advertisement

अशी रंगली लोकसभा निवडणूक

Advertisement

दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कालावधी

? या लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 या दिवशी पत्रकार परिषदेत केली. तेव्हापासून 4 जूनच्या मतगणनेपर्यंतचा कालावधी 80 दिवसांचा आहे. हा कालावधी 1952 च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता आतापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांमधला सर्वाधिक आहे.

प्रदीर्घ मतदान प्रक्रिया

? या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे सात टप्पे होते. 19 एप्रिलला प्रथम टप्पा पार पडला. तेव्हापासून 1 जूनचा अंतिम मतदान टप्पा पार पडेपर्यंतचा कालावधी 44 दिवसांचा होता. हा कालावधीही 1952 च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता इतर निवडणुकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

प्रतिकूल हवामान

? ही निवडणूक अत्यंत प्रतिकूल हवामान असताना झाली. संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या काळात देशाच्या बव्हंशी भागांमध्ये उष्णतेची लाट होती. इतके प्रतिकूल हवामान यापूर्वीच्या कोणत्याही लोकसभा निवडणुकीत नव्हते, असे मानले जाते. तरीही मतदान जवळपास 2019 च्या निवडणुकीइतकेच झाल्याचे दिसत आहे.

मतदारसंख्या 100 कोटीच्या नजीक

? संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडांची लोकसंख्या जेव्हढी आहे, त्यापेक्षा जास्त मतदार या लोकसभा निवडणुकीला लाभले आहेत. निवडणूक आयोगाच्या संख्येनुसार मतदारांची संख्या 96 कोटी 90 लाख इतकी आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंख्या 100 कोटी पार करणार आहे.

विदेशी माध्यमांचा दृष्टीकोन कसा...

? या लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच देशात निवडणुकीचे पडघम वाजण्यास प्रारंभ झाला होता. विदेशी माध्यमे आजपर्यंत नव्हती, इतक्या प्रमाणात या निवडणुकीविषयी संवेदनशीलता दाखवू लागलेली होती. काही विदेशी माध्यमे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ, काही माध्यमे विरोधात, तर काही माध्यमे नि:पक्षपाती मतांचे प्रदर्शन करताना दिसून येत होती.

? ही माध्यमे केवळ निवडणूक ‘पहात’ होती असे नाही, तर मध्ये मध्ये आपली मतेही व्यक्त करीत होती. भारतीय मतदारांनी कोणाला निवडून द्यावे, याचे डोसही पाजत होती. अगदी भारतातील विशिष्ट राजकीय पक्षांची तळी उचलून धरण्यापर्यंत काही विदेशी वृत्तपत्रांची आणि वृत्तवाहिन्यांची मजल गेली होती. यावरुन जगात भारताचे महत्व किती वाढले आहे, याची सुखद प्रचितीही येत होती.

? न्यूयॉर्क टाईम्स या अमेरिकेच्या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सामर्थ्य वाढत आहे, असा निर्वाळा दिला होता. भारतातील मतदार त्यांना आणखी सामर्थ्यवान करण्याच्या प्रक्रियेत आहेत. हिंदू राष्ट्रवाद आणि कल्याणकारी योजना यांच्या साहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी होतील, असे प्रतिपादन केले होते.

भारतात आता राष्ट्रवाद प्रबळ होत आहे, असे या वृत्तपत्राने उल्लेखिले होते.

? ब्रिटनमधील लोकप्रिय वृत्तपत्र डेली एक्स्प्रेसचे सहसंपादक सॅम स्टीव्हन्सन यांनी भारतातून या निवडणुकीचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ मागविला होता. त्याच्या आधारावर त्यांनी लिहिले आहे की, जगाने भारतविरोधी ‘बकवास’ बंद केला पाहिजे. आता आम्ही नव्या भारताच्या नव्या सकारात्मक संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला समर्थ करत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.

? विरोधी विदेशी पत्रकारांचा सूर भारतातील मानवाधिकार स्थिती, अल्पसंख्याकांवरील तथाकथित अन्याय, वृत्तपत्र स्वातंत्र्यावरील निर्बंध आदींचा निषेध करण्याकडे होता. वीडेम या पत्रकारांच्या संस्थेने लिबरल डेमॉव्रेटिक इंडेक्स अहवालात भारताचे नकारात्मक चित्र रंगविले आहे. तथापि, डेली एक्स्प्रेसच्या संपादकांनी या अहवालावर टीका केली असून तो पूर्णत: फेटाळून लावला आहे.

? गार्डियन या वृत्तपत्राने भारतातील लोकतंत्र कमजोर होत आहे असे मत मांडले होते. यासाठी त्यांनी भारतातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना उत्तरदायी मानले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला हिंदू राष्ट्रवादी देश म्हणून परिचय देत आहेत. भारतातील विरोधी पक्षांचे महत्व कमी करत आहे, असे आरोपही या वृत्तपत्राने केले होते. मात्र, अशी मते व्यक्त करणारी विदेशी माध्यमे मोजक्या संख्येने आहेत.

? अल जझीरा या अरबी वृत्तपत्राने भारतातील लोकसभा निवडणुकीच्या विशालतेवर मतप्रदर्शन केले आहे. अयोध्येतील भव्य राममंदीर हा भारतीय जनता पक्षाचा प्रमुख मुद्दा असून तो हिंदू राष्ट्रवादाचा मुख्य आधार आहे. हा पक्ष या कार्यक्रमाच्या आधारावर भारतात अधिकाधिक लोकप्रिय होत आहे, अशी टिप्पणी या वृत्तपत्राने केली असून या पक्षाचा विजय होईल, असे भाकितही पेले आहे.

? भारत-अमेरिका संबंधांचे विषेशज्ञ आणि विख्यात पत्रकार रॅन सॉमर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र करण्याचा निर्धार आहे. ही त्यांची भावनिक महत्वाकांक्षा नाही, तर आर्थिक सुधारणा, भक्कम प्रशासन व्यवस्था,  तंत्रवैज्ञानिक संशोधन तिच्यामागे आहे, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

आघाड्या आणि बिघाड्याही...

? या निवडणुकीची चाहूल दहा महिन्यांपूर्वीच लागली होती. विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाचा विजयरथ आडविण्यासाठी एका महाआघाडीची स्थापना केली. इंडियन नॅशनल डेमॉक्रेटिक इन्क्ल्यूझिव्ह अलायन्स किंवा ‘इंडी आघाडी’ असे या आघाडीचे नामकरण करण्यात आले. एकास एक अशी लढत करण्याचे ध्येय या आघाडीचे होते. ते काही अंशी साध्य झाले तर काही अंशी असफल ठरले.

? या आघाडीत काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, द्रविड मुन्नेत्र कळघम, डावी आघाडी आदी महत्वाचे पक्ष आहेत. तथापि, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथे आघाडीतीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. आघाडीसाठी पुढाकार घेणारे नितीश कुमार बाहेर पडले. आरएलडी पक्षही ऐनवेळी बाहेर पडला आहे. या दोन्ही पक्षांनी थेट भारतीय जनता पक्षाशीच हातमिळवणी करुन टाकली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय लोकशाही आघाडी

? या आघाडीत भारतीय जनता पक्ष, संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, तामिळनाडूतील पटली मक्कळ काची, तेलगु देशम, पवन कल्याण यांचा पक्ष, केरळमधील दोन छोटे पक्ष आदी पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष 440 जागांवर स्पर्धेत आहे. इतर पक्ष 110 जागांवर स्पर्धेत आहेत. या आघाडीला निवडणूक जवळ येत असताना संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल आणि तेलगु देशम असे तीन आणखी पक्ष येऊन मिळाल्याने सामर्थ्य वाढले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article