Satara News : साताऱ्यातील शासकीय जागेतील अतिक्रमण हटवले, स्थानिकांनी मानले आभार
त्यामुळे स्थानिकांना जातायेता त्रास सहन करावा लागत होता
सातारा : सातारा शहरात यादोगोपाळ पेठेत मे महिन्याच्या अवकाळी पावसाने चिखलाने राडारोडा आला. त्याच दरम्यान गणेश टाकीच्या परिसरात असलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण झाले होते. त्यामुळे स्थानिकांना जातायेता त्रास सहन करावा लागत होता.
त्यांनी सातारा नगरपालिकेकडे अर्ज, विनंत्या केल्यानंतर पालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण काढून घेतले असून त्यामुळे तेथील स्थानिकांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि अतिक्रमण हटाव विभागाचे आभार मानले. साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत गणेश टाकीला लागून नगरपालिकेची मोकळी जागा होती. त्या जागेत काही नागरिकांनी अतिक्रमण केले असून त्या अतिक्रमणामुळे अवकाळीच्या पावसाचे पाणी हे शेजारच्या घरात शिरले होते.
त्याबाबतची तक्रार सातारा नगरपालिकेकडे करण्यात आली होती. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट आणि अतिक्रमण हटाव विभागचे प्रमुख प्रशांत निकम यांनी तेथील अतिक्रमण हटवले. त्यांनी कार्यवाही केल्यामुळे तेथील स्थानिकांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे आभार मानले.
मुख्याधिकाऱ्यांकडून कार्यवाही
"आम्ही येथील अतिक्रमणाबाबत तक्रार करताच मुख्याधिकारी साहेबांनी दखल घेतली. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे खूप खूप आभारी आहेत."
- बाळासाहेब पवार
पालिकेने दखल घेतली धन्यवाद
"आम्ही आमचा होणारा त्रास सातारा नगरपालिकेकडे तक्रारवजा मांडला. सातारा नगरपालिकेने आमच्या तक्रारीची दखल घेवून कार्यवाही केली. नगरपालिकेचे धन्यवाद. त्याबद्दल सातारा नगरपालिकेचे धन्यवाद."
- माधवी कुलकर्णी