महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘शारदा पीठ’ परिसरात पाक सैन्याकडून अतिक्रमण

06:41 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॉफी होमची केली निर्मिती : हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीट म्हणजेच देवी सरस्वतीच्या प्राचीन मंदिरावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला आहे. नियंत्रण रेषेनजीक नीलम नदीच्या काठावर असलेल्या या धार्मिक स्थळाच्या परिसरात पाकिस्तानी सैन्याने ‘कॉफी होम’ निर्माण केले आहे. तर शारदापीठाची कुंपण भिंत तोडण्यात आली आहे. शारदा पीठ हे मुजफ्फराबादपासून सुमारे 140 किलोमीटर तर कुपवाडापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या या आगळीकीप्रकरणी शारदा समिती, काश्मीरचे संस्थापक तसेच प्रमुख रविंद्र पंडित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. याबाबत शारदा समितीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले आहे. शारदा पीठाच्या परिसरात पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाबद्दल काश्मिरी हिंदूंनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article