For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एन्काऊंटरच थांबवेल चिमुरड्यांवरील अत्याचार

06:36 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
एन्काऊंटरच थांबवेल चिमुरड्यांवरील अत्याचार
Advertisement

शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, मात्र एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. अशी आपली राज्यघटना आणि न्यायसंस्था सांगते. मात्र नेमका याचाच गैरफायदा घेत अनेक विकृत नराधम सुस्साट सुटलेत. अगदी चिमुरड्यापासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत अनेकांच्या शरीराचे लचके तोडले जात आहेत. यामुळे एन्काऊंटर नावाचे ब्रम्हास्त्रच चिमुरड्यावरील अत्याचार थांबवू शकते असा जनमताचा कौल आहे.

Advertisement

मिट जायेगा अंधकार कभी ना कभी ।।

मिलेगी राहत तुझे कभी ना कभी ।।

Advertisement

या काव्यपंक्तींच्या आधारे न्यायाची प्रतिक्षा प्रत्येक अन्याय पिडीतेला करावी लागते. न्याय मिळता-मिळता निम्मी अधिक वर्षे त्यामध्येच जातात. पण न्याय काही मिळत नाही. सध्या अशीच अवस्था देशातील बलात्कार पिडीत कुटुंबियांची आहे. बदलापूर येथील चिमुरड्यावरील अत्याचाराने संपूर्ण देश ढवळून निघाला. जे वय खेळण्या-बागडण्याचे त्या वयातच अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागल्याने, याच्या जखमा चिमुरड्यांच्या मनात खोलवर जाऊन ऊततात. लहान मुले म्हणजे देवाघरची फुले, मात्र इवल्याशा कळ्यांचे फुलात ऊपांतर होण्यापूर्वीच त्या कोमेजुन जायला सुऊवात झाली आहे.

या इवल्याशा कळ्यांवर वाईट नजर टाकणाऱ्यांचा वेळीच एन्काऊंटर केला तर पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्यास कोणाची हिम्मत होणार नाही. मात्र ज्या घरात अशा घटना घडत आहेत त्या कुटुंबियांना त्यांच्या पिडीत मुलीच्या आक्रोशाने झोप येत नाही. आपल्याच बाळाबाबत असे का? असा प्रश्न चिमुरड्यांच्या माता-पित्याला पडल्याशिवाय राहत नाही. तर अशा घटना ऐकून संपूर्ण शरीरावर शहारे येतात. तर हा अत्याचार सहन केलेल्या चिमुरड्यांच्या मनाचे काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

यामुळे अशा घटनांना आळा घालायचा असेल तर पोलिसांनी एन्काऊंटर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढावे. यापूर्वी हैद्राबाद पोलिसांनी जे अत्याचार करणाऱ्या नराधमांचा एन्काऊंटर केला तसा एन्काऊंटर राज्य पोलिसांनी केला तर कुठे बिघडते. असा सूर या पिढीतल्या कुटुंबियांचा आहे. एका बाजुने पाहिले तर त्यांचेही म्हणणे रास्त आहे. कारण जिच्यावर अन्याय, अत्याचार होतो, ती देखील कोणाची मुलगी, बहिण असते. मात्र अन्याय करणाऱ्या विकृतांना त्यावेळेस याचे काही एक भान नसते. अंगात सैतान संचारल्यासारखे लचके तोडण्याचे काम हे नराधम करतात. यामुळे यांना हैद्राबाद पोलिसांनी जी शिक्षा दिली ती योग्यच असल्याचे जनमत देशांत तयार झाले आहे. जर अशा प्रकारचा एन्काऊंटर झालेच तर नराधमावर एक प्रकारे मोठी दहशत निर्माण होईल. न्यायाच्या वेळखाऊ प्रक्रियेचा फायदा अनेक नराधम घेतात. मात्र अशा एन्काऊंटरमुळे नक्कीच त्यांना दहशत बसू शकेल. यापूर्वी जे एन्काऊंटर झाले, त्याची चर्चा किंवा ते खरे की खोटे याची शहानिशा आपण येथे करीत नाही. कारण यापूर्वीचे एन्काऊंटर हे अंडरवर्ल्ड विऊद्ध उगारलेले ब्रम्हास्त्र होते. आता जे एन्काऊंटर ब्रम्हास्त्र बाहेर काढायचे आहे ते कोणाची तरी बहिण, आई, मुलगी, पत्नी यांच्या संरक्षणासाठी काढायचे आहे. बदलापूर घटनेनंतर अनेक घटना बाहेर येण्यास सुऊवात झाली. प्रत्येक घटना ही अल्पवयीन मुलीच्या बाबतीतच अधिक प्रमाणात घडल्याचे आढळून आले आहे. केवळ मुंबईच नाही तर राज्यात तसेच देशात देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

राज्यातील अहमदनगर जिह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 साली एका पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अनन्वयीत अत्याचार करीत तीन नराधमांनी तिची हत्या केली. कोपर्डी येथील अत्याचार हत्येप्रकरणाने संपूर्ण देश हादऊन निघाला. तर संपूर्ण राज्यभरात या चिमुरडीला न्याय देण्यासाठी एकच आंदोलन सुऊ झाले. पुढे या आंदोलनाने वणव्याचे रौद्रऊप धारण करीत संपूर्ण राज्य व्यापले. यातील पकडल्या गेलेल्या तीन नराधमांना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. आजही देशात अशा प्रकारचे कोठे कृत्य झाले तर संपूर्ण कोपर्डी स्वत:च्या मुलीच्या दुखात आकंठ बुडालेली असते. काय दोष होता त्या चिमुरडीचा. स्वत:ची लैंगिक वासना भागविण्यासाठी चिमुरडीच्या आयुष्याची होळी केली. या कुटुंबियांची मानसिकता काय असेल? याचा जराही कयास लावता येणार नाही. आजही कोपर्डी न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. जोपर्यंत देशातील घटनांना आळा बसेल, तेंव्हा कोपर्डीला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. अशी भावना येथील नागरिकांची आहे.

तर देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेने देशच नाही तर जग देखील हादऊन गेले होते. 16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौघांची फाशीची शिक्षा कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयाने देशवासीयांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ केला. मात्र न्यायसंस्थेची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्याने, गुन्हा करण्यास हे नराधम खुलेआम धजावत आहेत. तर काही काही संघटनांनी निर्भया प्रकरणातील आरोपींना मिळालेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात राजधानीत निदर्शनेही केली. यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास विकृतांची मजल जात आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरण ताजे आहे तोच, देशाच्या आर्थिक राजधानीत एका छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्याने, संपूर्ण देशात आगडोंब उसळला. यातील माथेफिऊंना पोलिसांनी अटक देखील केली. तर यामध्ये एक आरोपी अल्पवयीन असल्याने, त्याला कमी शिक्षा देत सोडून दिले. मात्र आज तोच अल्पवयीन आरोपी सराईत गुन्हेगारी टोळी चालवित आहे. बलात्काराच्या गुह्यातून बाहेर आल्यानंतर त्याने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

ज्याप्रकारे हैद्राबाद पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांची नांगी एन्काऊंटर कऊन ठेचली. अगदी तशीच या गुन्हेगाराची नांगी  ठेचली असती तर शहरातील एक गुन्हेगारी टोळी लयास गेली असती हे मात्र नक्की. यामुळे एन्काऊंटर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढण्याची वेळ आली आहे. प्राथमिक तपासात हाच आरोपी असल्याचे सिद्ध होत असेल तर एन्काऊंटर नावाचे ब्रम्हास्त्र बाहेर काढायलाच पाहिजे.

या ब्रम्हास्त्राचा वापर केल्याने, अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल की नाही हे काही दिवसांत आढळून येईल. ही संपूर्ण भावना देशवासियांची आहे. त्यांच्या भावनेचा विचार केला तर एन्काऊंटरच चिमुरड्यावरील अत्याचार थांबवू शकेल ही आशा आहे. कारण देशातील अशा अनेक निर्भया आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.