For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोस्ट वाँटेड गुन्हेगाराचे उत्तर प्रदेशात एन्काऊंटर

06:01 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोस्ट वाँटेड गुन्हेगाराचे उत्तर प्रदेशात एन्काऊंटर
Advertisement

निवडणूक संपताच योगी सरकार कृतीत

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे पोलिसांनी केलेल्या चकमकीत मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार प्रशांत सिंग याचे एन्काऊंटर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्रे आणि एक दुचाकीही जप्त केली आहे. प्रशांत सिंगवर खून आणि दरोड्याचे 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो खूप दिवसांपासून तपास यंत्रणांच्या निशाण्यावर होता.

Advertisement

उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपताच कायदा आणि सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई सुरू झाली आहे. योगी सरकार गुन्हेगारांवर सातत्याने कडक कारवाई करत आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलीस आणि कुख्यात गुन्हेगार प्रशांत सिंग उर्फ प्रिन्स यांच्यात चकमक झाली. प्रशांत सिंगने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली.

शहागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मे रोजी आशुतोष श्रीवास्तव यांची हत्या करण्यात आली होती. प्रशांत सिंगसह त्याच्या साथीदारांवर या हत्येचा आरोप होता. प्रशांत सिंगने यापूर्वीही अनेक खून आणि दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. सात वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर एक लाख ऊपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. प्रिन्स जौनपूरच्या खेतसराय पोलीस स्टेशन परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक त्याच्या मागावर पाठविण्यात आले होते

चकमकीत प्रशांतचा मृत्यू

प्रशांतने आ़श्रय घेतलेल्या भागात पोलिसांची टीम पोहोचताच तेथे चकमक झाली. प्रशांतने पोलिसांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर दिले. गोळी लागल्याने प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. चकमकीत मारल्या गेलेल्या गुन्हेगाराकडून पोलिसांनी दोन 9 एमएम शस्त्रे जप्त केली आहेत. त्याच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.