कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुडाळ येथे रोजगार मेळावा ; एमआरएफचे पितळ उघड

07:09 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिंधुदुर्गमधील मनसे नेत्यामुळे बनवेगिरीची पोलखोल

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

कुडाळ येथे होणाऱ्या नोकरभरती मेळाव्याची बातमी खोटी असल्याची बतावणी करत एमआरएफ कंपनीने कानावर हात ठेवले असले तरी सिंधुदुर्गमधील मनसेच्या नेत्याकडून सदर मेळावा रद्द झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्यामुळे एमआरएफचे पितळ उघडे पडले आहे. त्यातून मेळावा आयोजनाची बातमी खोटी नव्हती तर एमआरएफचे व्यवस्थापनच खोटारडे होते, हेच सिद्ध झाले.

एमआरएफकडून कुडाळ येथे नोकरभरती मेळावा घेण्याचे निश्चित झाले होते व त्यादृष्टीने त्यांनी सिंधुदुर्गमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यामार्फत आयोजनाची संपूर्ण तयारी केली होती. या मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे 250 प्रशिक्षणार्थी कर्मचारी भरतीचे नियोजन होते. त्याशिवाय या कर्मचाऱ्यांसाठी निवास आणि जेवणाची मोफत सोय, वार्षिक पगारवाढ आदी सुविधाही देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सदर मेळावा दि. 12 रोजी भरणार होता. मात्र तत्पूर्वीच त्यासंबंधी पोस्ट व्हायरल झाली आणि त्यातून गोव्यात प्रचंड गदारोळ माजला. त्याशिवाय आरजी, गोवा फॉरवर्ड या राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सदर मेळाव्याच्या आयोजनास विरोध केला. त्यानंतर  एमआरएफ कंपनीने ‘तो मी नव्हेच’ जी भूमिका घेत कानावर हात ठेवण्याचे प्रयत्न केले. कुडाळमधील मेळाव्याची जाहिरात खोटी आहे, आम्ही असा कोणताही मेळावा आयोजित केलेला नाही, अशी बतावणीही त्यांनी केली. परंतु दुसऱ्याच दिवशी श्री. परब यांनी स्वत:च, एमआरएफ कंपनीने आपणास ईमेल पाठवून कुडाळमधील रोजगार मेळावा रद्द केल्याचे कळविले असल्याचे जाहीर केले. त्यावरून एमआरएफचे पितळ उघडे पडले.

दरम्यान, गोव्यात झालेल्या विरोधातून धास्ती घेतलेल्या एमआरएफने शुक्रवारी फर्मागुडी येथे नोकरभरती मेळावा घेतला. त्यातून हे प्रकरण मिटिण्याचे त्यांनी प्रयत्न केले असले तरी त्यांची बनवेगिरी उघडकीस आल्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article